भू-नमन-वज्रासन
भू-नमन-वज्रासन(Bhu-Naman-Vajrasana) हा एक वज्रासनाचा प्रकार असून हा सुप्त वज्रासनाच्या विरुद्ध आहे. या मध्ये आपल्याला समोर झुकून आपले नाक जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनाचा नियमित सराव आपल्याला मधुमेह, उदररोग सर्दी, वातविकार, अग्निमांद्य, स्वप्नदोष, निद्रानाश, दमा, मुरडा या सारख्या आजारांपासून दूर ठेवतो.
कृती
- आधी वज्रासनात आसनस्थ व्हा.
- नंतर हळू हळू पुढे वाका.
- पुढे वाकत असताना आपले दोन्ही हात पाठीमागे न्या व उजव्या हाताने डाव्या हाताच्या कोपऱ्या खाली पकडा आणि डाव्या हाताने उजव्या हाताच्या कोपऱ्या खाली पकडा.
- खाली वाकत असतांना श्वास रोखून धरा.
- आता रोखलेला श्वास हळूहळू सोडत मान लांब करून नाकाने जमिनीला स्पर्श करा.
- या ठिकाणी हे आसन पूर्ण होते.
सुरुवातीला हे आसन अत्यंत थोडा वेळ करावे नंतर हळू हळू वेळ वाढवत नेऊन दहा सेकंदापर्यंत हे आसन करता येईल.
महत्वाची सूचना: पाठदुखी, गुडघे दुखी किंवा उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
फायदे:
- या आसनाच्या नित्य सरावामुळे जठर सुदृढ बनते, यकृतातील विकृती दूर होते आणि स्वादुपिंडातील शिथिलता नाहीशी होऊन ते सक्रिय बनते.
- या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. तसेच पोट आणि छातीचे स्नायू बळकट बनतात.
- बद्धकोष्ठता नाहीशी करण्यासाठी हे आसन म्हणजे एक अमोघ साधन आहे.
- या आसनामुळे मधुमेह, उदररोग सर्दी, वातविकार, अग्निमांद्य, स्वप्नदोष, निद्रानाश, दमा, मुरडा , आणि अजीर्णसारखे रोग दूर होतात.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏