Skip to main content

Purvottanasana information in Marathi | पूर्वोतानासन मराठी माहिती

पूर्वोतानासन 

पूर्वोतानासन, हे आसन करताना आपल्या शरीराचा धडाच भाग वर उचल्या जातो. येथे पूर्व म्हणजेच पूर्व दिशा नसून आपल्या शरीराचा वरील भाग आणि उत्तानासन म्हणजेच वर उचलणे किंवा खेचून धरणे असा होतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला जीवनातील दैनंदिन ताण तणावापासून मुक्ततता मिळते. तसेच थॉयरॉईड(Thyroid) ग्रंथीचे कार्य सुधारते व आपली शारीरिक कमजोरी दूर होऊन शरीरात नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. या आसनालाच इंग्रजी मध्ये Upword Plank Pose किंवा East Streaching Pose असे सुद्धा म्हणतात. पूर्वोतानासन या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जाणून घेऊयात. (Purvottanasan information in marathi)

कृती :

  • आपल्या नियमित योग करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय सरळ लांबवून बसा. 
  • बसलेले असताना आपल्या पाठीचा कणा सुद्धा ताठ ठेवा. 
  • आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील असे चिपकवून राहू द्या. 
  • आता आपले दोन्ही हात कंबरेच्या किंवा खांद्यांच्या रेषेत जमिनीवर ठेवा. 
  • दोन्ही हातांची बोटे बाहेरच्या दिशेने  असू द्या. 
  • आत हळूहळू मागे झुकून आपल्या शरीराचा भार आपल्या दोन्ही हातावर घ्या. 
  • आपले हात सरळ ठेवा, कोपरात वाकणार नाहीत याची काळजी घ्या. 
  • श्वास घेत आपल्या कमरेचा भाग आणि गुडघे वर उचला. 
  • गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्या. 
  • आपले पायाचे तळवे जमिनीला चिटकवून राहू द्या, आणि आपले डोके जमिनीकडे सैल सोडून द्या. 
  • हि या आसनाची शेवटची स्थिती आहे, काही वेळासाठी या स्थितीत राहा. 
  • या स्थितीत श्वासोश्वास चालू राहू द्या. 
  • आता श्वास सोडत हळुवार पूर्व स्थितीत या. 
  • काही क्षणांच्या विश्रांती नंतर हातांची बोटे आतल्या बाजूने ठेवून हे आसन परत करावे. 

फायदे:

  1. या आसनाच्या सरावामुळे आपले मन प्रसन्न होऊन आपल्याला ताणतणावापासून मुक्तता मिळते. 
  2. हे आसन करत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या दोन्ही हातावर पडतो त्यामुळे आपली मनगटे, हात व खांदे मजबूत बनतात. 
  3. हे आसन करत असताना आपल्या पाठीच्या व कमरेच्या स्नायूंवर भरपूर ताण पडतो त्यामुळे त्यांचा व्यायाम होऊन तेथील स्नायू मजबूत व बळकट बनतात. 
  4. हे आसन करताना पोटातील अवयवांवर सुद्धा ताण पडतो व त्यांचा व्यायाम होतो, त्यामुळे आपली पचन संस्था सुरळीत कार्य करते. 
  5. या आसनाच्या नियमित सरावामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य सुद्धा सुधारते व सुरळीत चालते. 

महत्वाची सूचना: आपल्या मनगटाला काही दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये, तसेच आपल्याला मानेचा किंवा कमरेचा काही त्रास असल्यास हे आसन करू नये. 
आपल्या शारीरिक क्षमते पेक्षा जास्त जोर लावून कोणतेही आसन करू नये. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...