या आसनाचा सराव करताना आपल्या शरीराची आकृती त्रिकोणासारखी बनते म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे नाव पडले आहे. या आसनाचा सराव करताना आपले शरीर तीन कोनांमध्ये विभागले जाते. या आसनाच्या सरावामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबीचे विघटन होऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते. त्रिकोणासनापासून मिळणारे विविध फायदे व त्याची कृती या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(Trikonasana information and benefits in Marathi)
कृती:
- सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर सरळ उभे राहा.
- आपले दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर असे चिपकून राहू द्या.
- उभे असताना आपल्या दोन्ही पायामधे काही अंतर सोडा. साधारणतः ७५ से.मी.एव्हडे .
- आता आपले दोन्ही हात वर उचलून आपल्या खांद्यांना सरळ रेषेत समांतर असे ठेवा.
- या स्थितीत आपले हाताचे तळवे हे जमिनीकडे झुकलेले असावे.
- आता आपल्या डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा.
- असे करत असताना आपला उजवा हात सरळ आकाशाकडे वर न्या.
- आपली नजर आपल्या उजव्या हाताच्या पंज्याकडे स्थिर करा. (चित्रात नजर खाली आहे, परंतु आपली नजर उजव्या हाताच्या तळव्याकडे असावी.)
- या अवस्थेत दोन सेंकंद राहा. हि सर्व कृती चालू असताना आपला श्वासोश्वास नियमित चालू ठेवा.
- पूर्व स्थितीत आल्या नंतर काही वेळाने हीच कृती आता उजवा हात आणि उजवा पायाने करावी.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास भरपूर मदत होते.
- या आसनाचा नियमित सराव कमरेचे आणि पायांचे सांधे मजबूत बनवतो.
- मान व खांद्यांचे सांधे जर दुखत असतील तर या आसनाच्या सरावाने ती तक्रार दूर होते.
- याआसनाचा नियमित सराव ताण तणाव कमी करण्यास मदत करतो.
- या आसनाचा नियमित सराव पाठ दुखीचा त्रास कायमचा घालविण्यासाठी मदत करतो.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक शांतता मिळते.
महत्वाची सूचना: ज्यांना पाठदुखीचा किंवा मानेचा त्रास आहे किंवा मणक्यांमध्ये गॅप आहे त्यांनी या आसनाचा सराव करू नये , किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या आसनाचा सराव करावा.
गरोदर स्त्रियांनी या आसनाचा सराव करू नये.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏