आता आपण पायावरील आसनांचे प्रकार बघूयात. या आसनामध्ये शरीराचा आकार गरुडाप्रमाणे दिसतो म्हणून याला 'गरुडासन' (Garudasana)असे म्हणतात. इंग्रजी मध्ये या आसनाला इगल पोझ (Eagle pose) असे म्हणतात. या आसनाच्या नियमित सरावामुळे हातापायांमधील संधिवाताचा त्रास दूर होतो तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी सुद्धा या आसनाची भरपूर मदत होते.
![]() |
| pic credit- https://pixahive.com/photo/garudasana-yoga/ |
कृती:
- प्रथम दोन्ही पायांवर सरळ उभे राहा.
- उजवा पाय सरळ ठेऊन डावा पाय आकृतीत दाखवल्याप्रमाणे उजव्या पायाच्या गुडघ्यावरून त्याला विळखा घाला.
- डाव्या पायाची मांडी उजव्या मांडीवर आना आणि डाव्या पायाच्या पंजाचे टोक जमिनीकडे आना.
- त्यानंतर पायांची जमिनीला घट्ट पकड ठेऊन स्थिर उभे राहण्याचा प्रयत्न करा. आता हातांचा विळखा घालून हातांचा नमस्कार करावा. आकृतीत दाखविल्या प्रमाणे या स्थितीत हाताचे कोपर जामिनाला काटकोनात येतील याचा प्रयत्न
- हात चेहऱ्याच्या समोर ठेवावे, या स्तिथीत आपले दोन्ही हात गरुडाच्या चोची प्रमाणे दिसतात.
- हि सर्व क्रिया चालू असताना श्वासोच्छवास चालू ठेवावा.
- या स्तिथीत आठ ते दहा सेकंड राहिल्या नंतर पायांची व हातांची स्तिथी बदलून परत गरुडासन करावे.
फायदे:
- या आसनामध्ये आपण एका पायावर उभा राहण्याचा सराव करतो त्यामुळे आपले मन एकाग्र होते.
- हे आसन करताना संपूर्ण शरीराचा भार एका पायावर पडतो त्यामुळे पाय सशक्त व मजबूत बनतात, तसेच हातापायाच्या नसा खेचल्या जाऊन हातापायांना भरपूर व्यायाम मिळतो.
- या आसनाच्या नित्य सरावामुळे उंचीत वाढ होते.
- या आसनाच्या सरावामुळे हातापायांमधील संधिवाताचा त्रास दूर होतो.
- या आसनाच्या नित्य सरावामुळे नितंब आणि पोटऱ्या दुखण्याची तक्रार दूर होते.
- वृषणातील पेशींना जर सूज आली असेल तर या आसनाच्या सरावाने ती नाहीशी होते.
टीप : ज्यांची गुडघ्यांची किंवा हाताच्या कोपऱ्यांची शस्त्रक्रिया नुकतीच झाली आहे किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्या नुसारच या आसनाचा सराव करावा.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏