कंदपीडासन /कंदपीडनासन
हे आसन करण्यासाठी खूप अवघड आहे, त्यामुळे हे आसन सर्वांनाच जमेल असे नाही. या आसनाच्या सरावामुळे संधिवातासारखे विकार बरे होतात. हे आसन करताना नाभीस्थानात जे मणिपूरचक्र असते, त्यावर दाब पडून त्याला त्रास होतो; म्हणून या आसनाला कंदपीडासन किंवा कंदपीडनासन असे म्हणतात. कंदपीडासनाची कृती व फायद्या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेऊयात. (Kandapidasana / Kandapidnasana information in marathi)
कृती:
- सर्वप्रथम आपल्या योगा करण्याच्या आसनावर(Yoga Mat) बसा.
- आता आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पायांचे तळवे नाभीस्थानापर्यंत वर आणा.
- आता आपले दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत जोडून छातीला चिटकून राहूद्या.
- आपली मान, पाठ, आणि कंबर ताठ ठेवा.
- नाक, हाताचे पंजे, पायाचे तळवे सरळ एका रेषेत ठेवा.
- हे आसन करताना आपली श्वासोश्वासाची क्रिया नियमित आणि सावकाश चालू राहूद्या.
फायदे:
- हे आसन पद्मासन आणि सिद्धासनाच्या कक्षेतील असल्यामुळे पद्मासन आणि सिद्धासनापासून मिळणारे सर्व फायदे या आसनाच्या सरावापासून सुद्धा मिळतात.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पायाच्या पोटऱ्या व नसा मजबूत बनतात.
- या आसनाच्या सरावामुळे संधिवातासारखे विकार दूर होतात.
- तसेच गुडघ्याच्या सर्वप्रकारच्या तक्रारी पासून मुक्तता मिळते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे कुंडलिनी वर चढू लागते.
सूचना: हे आसन अत्यंत सावधपणे आणि शांततेने करा. स्थूल लोकांना हे आसन करताना त्रास होऊ शकतो परंतु किडकिडीत लोक हे आसन सहज करू शकतात.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏