चतुरंग दंडासन
"चतुरंग दंडासन" या आसनाच्या नावाची फोड केली तर आपल्याला या नावाचा अर्थ समजेल. चतुरंग = चतुर + अंग आणि दंडासन = दंड + आसन. चतुर म्हणजेच चार, अंग म्हणजे आपल्या शरीर, दंड म्हणजे मजबूत काठी आणि आसन म्हणजेच मुद्रा. हे आसन करताना आपल्या शरीराचे चार भाग एका मजबूत आणि सरळ काठी प्रमाणे बनतात म्हणून या आसनाला "चतुरंग दंडासन" असे म्हणातात. हे आसन सुरुवातीला करण्यासाठी थोडे अवघड असले तरी या आसनामुळे आपल्याला बरेच फायदे मिळतात. ज्या लोकांनी नवीनच योगासने करण्यासाठी सुरवात केली आहे त्यांच्या साठी हेआसन खूप फायदेशीर आहे कारण या आसनामुळे त्यांचे शरीर मजबूत आणि स्थिर बनेल तसेच पुढचे काही कठीण आसने करण्यास कार्यक्षम बनेल. हे आसन केल्यामुळे आपल्या शरीराला मजबुती मिळते तसेच आपले पोट सुटत नाही किंवा सुटलेले असल्यास ते कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये खाली बघणार आहोत. (Chaturanga Dandasana information in Marathi)
![]() |
| pic credit: https://ccnull.de/foto/yoga-low-plank/1008076 |
कृती:
- आपल्या योगा करण्याच्या आसनावर (Yoga Mat ) पोटावर झोपा.
- भुजंगासन करण्यासाठी आपण जसे दोन्ही हात जमिनीवर ठेवतो त्या प्रमाणे आपले हात ठेवा.
- आपल्या हाताची बोटे सरळ आणि पुढच्या दिशेला राहू द्या.
- आपल्या दोन्ही पायांची बोटे जमिनीला टेकवून राहू द्या.
- आता आपल्या पायांच्या दोन्ही बोटावर भार टाकून गुडघ्या पर्यंतचा भाग वर उचला आणि एक श्वास घेऊन आपल्या शरीराचा भार आपल्या दोन्ही हातावर उचला.
- आपल्या कोपर मध्ये ९० अंशाचा कोण तयार होईल या स्थितीत हातांना राहू द्या.
- या स्थितीत आपली मान, पाठ आणि कंबर सरळ एका रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा.
- हि चतुरंग दंडासनाची शेवटची स्थिती आहे, या स्थितीत सुरुवातीला २५ ते ३० सेकंड राहण्याचा प्रयत्न करा तसेच कमीत कमी ३ वेळा तरी या आसनाचा सराव करा.
- काही दिवसांच्या सरावानंतर तुम्ही हे आसन ३० ते ६० सेकंड करू शकता तसेच या आसनाची आवर्तने वाढवून ४ ते ५ वेळा करू शकता.
फायदे:
- मन स्थिर आणि शांत होते.
- आपले हातांचे आणि खांद्यांचे स्नायू मजबूत बनतात.
- तसेच संपूर्ण शरीरास बळकटी मिळते.
- पोटाची चरबी कमी होते तसेच पोटाचे स्नायू मजबूत बनतात.
- चेहरा तेजस्वी आणि चमकदार बनतो. पाठीचा कणा मजबूत बनतो.
- आपल्या शरीरात एक स्थिरता निर्माण होते.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏