Skip to main content

शशांकासन नैराश्य दूर करण्यास मदत करते | Shashankasana Marathi Information

शशांकासन 



कृती:
"शशांक" हा एक संस्कृत शब्द असून त्याचे "ससा" आणि "चंद्र" असे दोन अर्थ होतात. शशांकासन करताना आपल्या शरीराचा आकार एखाद्या सश्याप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला शशांकासन असे म्हणतात. तसेच या आसनाच्या सरावामुळे आपले मन चंद्राप्रमाणे शीतल आणि शांत होते. या आसनाचा नियमित सराव नैराश्य दूर करण्यास मदत करते. हे आसन करताना आपल्या मेंदूला भरपूर आणि सुरळीत रक्तपुरवठा होतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. विद्यार्थ्यांनी या आसनाचा नक्कीच सराव करायला हवा. रागावर नियंत्रण कसे करावे? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास त्याला शशांकसान हेच उत्तर राहील. पुढे आपण शशांकासनापासून होणारे विविध फायदे तसेच त्याची कृती कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेऊयात. (Shashankasana information in marathi)
  • सुरुवातीला आपल्या योग करण्याच्या आसनावर वज्रासनात(वज्रासनाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.) बसावे. 
  • वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपले दोन्ही हात सरळ वर करा. 
  • आता आपले शरीर हलके करून शरीराचा वरचा भाग हळू हळू समोर आणावा. समोर झुकताना हळू हळू श्वास बाहेर सोडावा. 
  • समोर झुकल्यानंतर आपले दोन्ही हात सरळ जमिनीवर टेकवा तसेच आपले कपाळ सुद्धा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 
  • या स्थितीत आल्यानंतर डोळे बंद करून घ्यावीत व आपला श्वासोश्वास चालू राहुद्यावा. 
  • काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर परत हळू हळू पूर्व स्थितीत म्हणजे वज्रासनात यावे. 
  • या आसनाचा २ ते ३ वेळा सराव करावा. 

फायदे:

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपला चिडचिडेपणा कमी होतो. 
  2. या आसनाचा नियमित सराव नैराश्य दूर करण्यास मदत करतो. 
  3. मेंदूतील रक्तपरिसंचरण सुधारते. 
  4. स्मरणशक्ती वाढते. 
  5. नियमित सरावामुळे पोट, कंबर, आणि नितंब या वरील चरबी कमी होते.
  6. हे आसन करत असताना पोटावर ताण पडत असल्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते.
  7. हे आसन करताना पाठीला भरपूर ताण मिळतो त्यामुळे पाठदुखीची समस्या सुद्धा नाहीशी होते. 

महत्वाची सूचना: जर आपल्यला स्लिपडिस्क, मानदुखी, किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर हे आसन करू नये. 
कोणतेही योगासन करताना ते हळू हळू व शांततेचं करावे. 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...