Skip to main content

उत्थित हस्त पादअंगुष्ठासन चे फायदे | Utthita Hasta Padangusthasana Benefits

  उत्थित हस्त पादअंगुष्ठासन 

उत्थित हस्त पादअंगुष्ठासन हे आसन पायावर उभे राहून करण्याच्या प्रकारातील आसन आहे. येथे उत्थित म्हणजे वर उचलणे, हस्त म्हणजे हात, पाद किंवा पद म्हणजे पाय आणि अंगुष्ठ म्हणजे अंगठा. तसेच या आसनाला इंग्रजी मध्ये Extended Hand-To-Big-Toe-Pose असे म्हणतात. या आसनाचा सराव केल्याने शारीरिक व मानसिक संतुलन बनून राहते तसेच आपली एकाग्रता वाढते. उत्थित हस्त पादअंगुष्ठासन ची कृती आणि फायदे या बद्दल माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (utthita hasta padangusthasana benefits and steps information in marathi)

image source: https://pixahive.com/photo/utthita-hasta-padangustasana-extended-hand-to-big-toe-2/

कृती: 

  • सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर आपल्या दोन्ही पायावर सरळ उभे राहा. 
  • आता एक खोल श्वास घेऊन आपला उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पोटाजवळ आणा. 
  • आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि आकृतीत दाखवल्या प्रमाणे हळू हळू पाय डोक्याकडे वर उचला. 
  • हि कृती करताना आपला तोल जाणार नाही याची दक्षता घ्या. 
  • आपला तोल सांभाळण्यासाठी आपला आपले लक्ष्य डाव्या पायावर केंद्रित करा. तसेच आपला डावा हात आपल्या कमरेवर किंवा आपल्या उजव्या हाताला समांतर ठेवा. 
  • आपला श्वासोश्वास नियमित चालू राहू द्या. 
  • हि आसनाची शेवटची स्थिती आहे या स्थितीमध्ये आपले शरीर स्थिर करून अर्धा ते एक मिनिट या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. 
  • आपला पाय गुडघ्यात सरळ असेल याची काळजी घ्या. 
  • आता हळूहळू पाय खाली आना आणि पूर्व स्थितीत या. 
  • काही मिनिटांच्या अंतराने हीच कृती आपल्या डाव्या पायाने करा.  

फायदे: 

  1. या आसनाच्या सरावामुळे आपले पाय, गुडघे आणि टाचा यांच्या पेशींना तणाव मिळून त्यांचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो व ते मजबूत बनतात.  
  2. मांड्यांच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. 
  3. या आसनाच्या सरावामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. 
  4. छातीचे स्नायू ताणले जाऊन श्वसन क्रिया सुधारते. 
  5. या आसनाच्या सरावामुळे पोटाच्या स्नायूंना सुद्धा भरपूर व्यायाम मिळतो त्या मुळे पचन शक्ती सुधारते. 
महत्वाची सूचना: या आसनाचा सराव योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. 
गुडघ्याला, मांडीला किंवा पायाला कुठल्याही प्रकारची दुखापत झाल्यास हे आसन करू नये. 
स्त्रियांनी मासिक पाळी दरम्यान किंवा गर्भधारणा असल्यास हे आसन करू नये. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...