सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे :
आपण या लेखामध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. या क्रियेला आयुर्वेदामध्ये उषःपान असे म्हटले जाते. ककचंडीश्वर_कल्पतंत्र" या आयुर्वेदिक ग्रंथात रात्रीच्या पूर्वार्धात पाणी पिणे विषारी असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री प्यालेले पाणी ‘दुधा’सारखे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आणि सकाळी (सुर्योदयापूर्वी) प्यायलेले पाणी आईच्या दुधाइतकेच फायदेशीर आहे असे म्हणतात.
उषःपान या शब्दाची फोड केल्यास उषा म्हणजे सकाळ आणि पान म्हणजे पाणी असा होतो. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आजारापासून वाचवता येते. तसेच आपल्या शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यासाठी ह्या क्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होतो. सध्या बहुतेक लोकांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे वजन कमी कसे करावे? याचे सोपे उत्तर म्हणजे उषःपान. नियमित रोज सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास उषःपान म्हणजे घरच्या घरी केलेली विनामूल्य वॉटर थेरेपी.
![]() |
| Image by: Photo by rawpixel.com form PxHere |
उषःपान कधी आणि कसे करावे?
सकाळी अंथरुणामधून बाहेर पडल्यावर चूळ न भरता पिल्या जाणारे पाणी म्हणजे उषःपान. चूळ भरल्यानंतर जर आपण पाणी पिले तर त्याचा फायदा आपल्याला कमी होतो. या यामध्ये अजून एक महत्वाची बाब अशी कि आपले मलमूत्र विसर्जनाआधी आपण पाणी प्यायला हवे.
पाणी कोणत्या भांड्या मध्ये ठेवावे?
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे फार आरोग्यवर्धक असते. आयुर्वेदात असे सांगितले आहे कि लोखंडाच्या भांड्यात ठेवलेले दूध आणि तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणाऱ्या व्यक्तीला यकृत आणि रक्ताशी संबंधित आजार कधीच होत नाहीत. आणि त्या व्यक्तीचे रक्त नेहमी शुद्ध राहते.
उषःपान करण्यासाठी पाणी जर तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवले तर त्यामधून अधिक आरोग्यदायक फायदे मिळू शकतात. पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे हे थेट जमिनीच्या संपर्कात ठेवू नये ते लाकडाच्या तुकड्यावर ठेवावे. आणि पाणी नेहमी खाली बसून प्यावे.
सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने मूळव्याध, ग्रहणी,ज्वर, उदर रोग, मेद रोग, मूत्राघात, रक्तपित्त, कैंसर, लघवी संबंधीचे आजार, किडनी, टीबी, त्वचा रोग इत्यादी आजार हळू हळू नाहीशे होऊ लागतात.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे काही महत्वाचे फायदे:
- सकाळी ३ ते ६ हा रात्रीचा शेवटचा प्रहर असून यालाच उषःकाल असे म्हणतात. हा प्रहर सात्विक असून या प्रहरामध्ये पाण्याची गुणवत्ता बदलते त्यामुळे या प्रहरामध्ये पिले जाणारे पाणी हि शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.
- शरीराच्या जैविक घड्याळानुसार या काळात फुफ्फुस सक्रिय राहतात. या काळात आपण उठलो, कोमट पाणी प्यालो आणि मोकळ्या हवेत फिरलो किंवा प्राणायम केला तर आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
- सकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये आपले मोठे आतडे कार्यन्वित असतात. मल त्याग करण्यासाठी हि चांगली वेळ आहे या वेळी मल त्याग करताना कोणताही त्रास होत नाही. या वेळी झोपलेल्या व्यक्तींच्या मोठ्या आतडी मध्ये हा मल तासाच पडून राहतो व त्यातील त्याज्य द्रवांश हि आतडी शोषून घेतात त्यामुळे बरेच आजार निर्माण होतात.
- सकाळी पाणी पिल्याने बद्धकोष्टता, ऍसिडिटी या सारखे आजार होत नाहीत.
- उषःपान करणाऱ्यांची म्हणजे सकाळी पाणी पिणाऱ्यांची त्वचा तजेलदार आणि सुंदर राहते.
- दररोज उषःपान केल्याने किडनी निरोगी राहते.
- रोज नियमित सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.
- तसेच पचनक्रिया सुधारते.
- पाण्यामध्ये एक नैसर्गिक विद्युत असते, जी रोगांचा नाश करण्यासाठी सक्षम असते. त्यामुळे पाण्याच्या विविध उपयोगामुळे शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्ञान तंतूंच्या चक्रावर अनोखा प्रभाव पडतो त्यामुळे मेंदूची शक्ती आणि क्रियाशीलता चमत्कारिकरीत्या वाढते.
महत्वाची सूचना: अल्सर सारखा कोणताही आजार असल्यास सकाळी पाणी पिऊ नये.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उषःपान करावे.

खूप छान माहिती आपल्या रोजच्या जीवनातील कोमट पाणी पिण्याबद्दल आणि त्याचे फायदे सांगितलं आहेत... 👌👌👌👍👍
ReplyDelete