Skip to main content

कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

 सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे :

आपण या लेखामध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. या क्रियेला आयुर्वेदामध्ये उषःपान असे म्हटले जाते. ककचंडीश्वर_कल्पतंत्र" या आयुर्वेदिक ग्रंथात रात्रीच्या पूर्वार्धात पाणी पिणे विषारी असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री प्यालेले पाणी ‘दुधा’सारखे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आणि सकाळी (सुर्योदयापूर्वी) प्यायलेले पाणी आईच्या दुधाइतकेच फायदेशीर आहे असे म्हणतात.
उषःपान या शब्दाची फोड केल्यास उषा म्हणजे सकाळ आणि पान म्हणजे पाणी असा होतो. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आजारापासून वाचवता येते. तसेच आपल्या शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यासाठी ह्या क्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होतो. सध्या बहुतेक लोकांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे वजन कमी कसे करावे? याचे सोपे उत्तर म्हणजे उषःपान. नियमित रोज सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास उषःपान म्हणजे घरच्या घरी केलेली विनामूल्य वॉटर थेरेपी. 
कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान
Image by: Photo by rawpixel.com form PxHere


उषःपान कधी आणि कसे करावे?

सकाळी अंथरुणामधून बाहेर पडल्यावर चूळ न भरता पिल्या जाणारे पाणी म्हणजे उषःपान. चूळ भरल्यानंतर जर आपण पाणी पिले तर त्याचा फायदा आपल्याला कमी होतो. या यामध्ये अजून एक महत्वाची बाब अशी कि आपले मलमूत्र विसर्जनाआधी आपण पाणी प्यायला हवे. 

पाणी कोणत्या भांड्या मध्ये ठेवावे?

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे फार आरोग्यवर्धक असते. आयुर्वेदात असे सांगितले आहे कि लोखंडाच्या भांड्यात ठेवलेले दूध आणि तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणाऱ्या व्यक्तीला यकृत आणि रक्ताशी संबंधित आजार कधीच होत नाहीत. आणि त्या व्यक्तीचे रक्त नेहमी शुद्ध राहते. 
उषःपान करण्यासाठी पाणी जर तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवले तर त्यामधून अधिक आरोग्यदायक फायदे मिळू शकतात. पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे हे थेट जमिनीच्या संपर्कात ठेवू नये ते लाकडाच्या तुकड्यावर ठेवावे. आणि पाणी नेहमी खाली बसून प्यावे. 

सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने मूळव्याध, ग्रहणी,ज्वर, उदर रोग, मेद रोग, मूत्राघात, रक्तपित्त, कैंसर, लघवी संबंधीचे आजार, किडनी, टीबी, त्वचा रोग इत्यादी आजार हळू हळू नाहीशे होऊ लागतात. 

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे काही महत्वाचे फायदे:

  • सकाळी ३ ते ६ हा रात्रीचा शेवटचा प्रहर असून यालाच उषःकाल असे म्हणतात. हा प्रहर सात्विक असून या प्रहरामध्ये पाण्याची गुणवत्ता बदलते त्यामुळे या प्रहरामध्ये पिले जाणारे पाणी हि शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. 
  • शरीराच्या जैविक घड्याळानुसार या काळात फुफ्फुस सक्रिय राहतात. या काळात आपण उठलो, कोमट पाणी प्यालो आणि मोकळ्या हवेत फिरलो किंवा प्राणायम केला तर आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
  • सकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये आपले मोठे आतडे कार्यन्वित असतात. मल त्याग करण्यासाठी हि चांगली वेळ आहे या वेळी मल त्याग करताना कोणताही त्रास होत नाही. या वेळी झोपलेल्या व्यक्तींच्या मोठ्या आतडी मध्ये हा मल तासाच पडून राहतो व त्यातील त्याज्य द्रवांश हि आतडी शोषून घेतात त्यामुळे बरेच आजार निर्माण होतात. 
  • सकाळी पाणी पिल्याने बद्धकोष्टता, ऍसिडिटी या सारखे आजार होत नाहीत.
  • उषःपान करणाऱ्यांची म्हणजे सकाळी पाणी पिणाऱ्यांची त्वचा तजेलदार आणि सुंदर राहते. 
  • दररोज उषःपान केल्याने किडनी निरोगी राहते. 
  • रोज नियमित सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. 
  • तसेच पचनक्रिया सुधारते. 
  • पाण्यामध्ये एक नैसर्गिक विद्युत असते, जी रोगांचा नाश करण्यासाठी सक्षम असते. त्यामुळे पाण्याच्या विविध उपयोगामुळे शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्ञान तंतूंच्या चक्रावर अनोखा प्रभाव पडतो त्यामुळे मेंदूची शक्ती आणि क्रियाशीलता चमत्कारिकरीत्या वाढते. 
महत्वाची सूचना: अल्सर सारखा कोणताही आजार असल्यास सकाळी पाणी पिऊ नये. 
तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच  उषःपान करावे. 


Comments

  1. खूप छान माहिती आपल्या रोजच्या जीवनातील कोमट पाणी पिण्याबद्दल आणि त्याचे फायदे सांगितलं आहेत... 👌👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...