हस्तमुद्रा म्हणजे काय?
आता पर्यंत आपण विविध योगासनाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या ब्लॉग मध्ये आपण हस्तमुद्रा म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
असे मानल्या जाते कि आपले शरीर हे पंचतत्त्व म्हणजे पाच तत्त्वांपासून बनले आहे. हि पंचतत्त्व म्हणजेच अग्नी, वायू, जल, पृथी, आणि आकाश . आपल्या शरीरातील ह्या तत्वांचे प्रमाण बिघडल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते.
योग आणि हस्तमुद्रा हि ५००० वर्षे जुनी पद्धती आहे. ज्याच्या नियमित सरावामुळे आपण आपले आरोग्य निरोगी बनवू शकतो. योगासना सोबतच हस्तमुद्रांचा सराव केल्यास आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हस्तमुद्रा या शब्दाची फोड केल्यास हस्त म्हणजे हात आणि मुद्रा म्हणजे एक विशिष्ट्य आकार असा होतो. योगासना मध्ये आपल्या हाताला एक अनन्य साधारण महत्व आहे जे आपल्या शरीरातील विविध नाड्याना जोडलेले असतात. आणि या नाड्यांमधुन आपल्या शरीरातील ऊर्जा वाहण्याचे कार्य चालू असते. हस्तमुद्रांच्या सरावामुळे आपण या ऊर्जावाहन्यांवर प्रभाव टाकू शकतो व आपले आरोग्य सुधारू शकतो. हस्तमुद्रांचा सराव आपण प्राणायम करताना किंवा ध्यान करताना करू शकतो.
योग शास्त्रामध्ये हस्तमुद्रेचे अनेक प्रकार नमूद केले आहेत त्यातील प्रत्येक मुद्रेचे शारीरिक व मानसिक असे अद्भुत फायदे आहेत. त्यातील काही विशिष्ट हस्तमुद्रांबद्दल आपण जाणून घेऊयात.
ज्ञान मुद्रा:
![]() |
| ज्ञान मुद्रा |
या मुद्रेमध्ये तर्जनी आणि अंगठा हि जोडली गेलेली असतात आणि बाकीचे बोटे हि सरळ असतात. या मुद्रेच्या सरावामुळे आपली एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते आणि आपला तणाव कमी होतो, शांत झोप लागते.
वायू मुद्रा:
![]() |
| वायू मुद्रा |
या मुद्रे मध्ये तर्जनी म्हणजे अंगठ्या जवळील बोट हे अंगठ्याच्या शेवटच्या टोकाला लावायचे आणि अंगठ्याने हलकासा त्याला दाबायचे. हि मुद्रा करण्याचे खूप अनेक फायदे आहेत. या मुद्रेच्या नियमित सरावामुळे पोटात तयार होणार गॅस (वायू) आणि ऍसिडिटी या वर नियंत्रण मिळवल्या जाते. वायू दोषामुळे होणार संधिवात ठीक होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच आपले मनःशांती साठी सुद्धा आपण हि मुद्रा करू शकतो.
आकाश मुद्रा:
![]() |
| आकाश मुद्रा |
हि मुद्रा धारण करताना आपली मध्यमा म्हणजे मधले बोट आणि अंगठा यांची टोके एकमेकांना स्पर्श करतात आणि बाकीचे तीन बोटे हे सरळ असतात. या मुद्रेच्या सरावामुळे आपल्या मध्ये सकारात्मक विचार तयार होतात. मनःशांती साठी सुद्धा आपण हि मुद्रा करू शकतो. या मुद्रेच्या सरावामुळे मनाला शांती मिळते. हृदयाशी निगडित समस्या दूर होतात. तसेच हाडे बळकट होतात. या मुद्रेच्या अभ्यासामुळे कानाशी निगडित समस्या दूर होतात व आपली श्रवणशक्ती वाढते.
शून्य मुद्रा :
![]() |
| शून्य मुद्रा |
या मुद्रेमध्ये मध्यमा म्हणजे मधले बोट गोलाकार करून अंगुष्ठ म्हणजे अंगठ्याच्या शेवटच्या टोकाला लावायचे आणि त्यावर अंगठ्याचा दाब द्यायचा. या मुद्रेच्या सरावामुळे कानासंबंधीचे सर्व दुखणे दूर होतात. आपली श्रवण शक्ती सुधारते. मानसिक रोगामध्ये सुद्धा या मुद्रेचा फायदा होतो. या मुद्रेच्या सरावामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडी मुळे होणारे त्रास या मुद्रेच्या सरावामुळे दूर होतात.
पृथी मुद्रा:
![]() |
| पृथ्वी मुद्रा |
या मुद्रे मध्ये अनामिका म्हणजे करंगळी जवळील बोट आणि अंगठा यांची टोके एकमेकांना स्पर्श करतात. या मुद्रेच्या सरावामुळे शरीरात चैतन्य निर्माण होते व आत्मविश्वास वाढतो. शरीरातील थकवा दूर होतो. तसेच आपली पचन क्रिया सुधारते. पोटात होणारा गॅस, मूत्रमार्गातील दाह, केस गळती, अल्सर या सर्वांवर पृथी मुद्रा गुणकारी आहे.

.jpeg)


.jpeg)
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏