शवासन
आज आपण जाणून घेउयात 'शवासन' कसे करावे? हे आसन सर्व आसनांच्या सुरुवातीला, मध्ये, आणि शेवटी करायलाच हवे. हे आसन सर्व स्नायू, नाड्या इत्यादींना पुष्कळ विश्रांती मिळवून देते. अत्यंत साधे वाटणारे हे आसन मात्र साध्य होण्यास फार कठीण आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात शरीराला अत्यंत थोड्याच वेळात भरपूर आराम मिळवून देण्यासाठी या आसनाचा उपयोग केला जाऊ शकतो. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मराठी मध्ये जाणून घेउयात. (Shavasana Information in Marathi)
![]() |
| Photo by Elly Fairytale from Pexels |
कृती:(Shavasana steps and benefits)
- पाठीवर सरळ झोपा.
- हात शरीरापासून दूर ठेवा.
- हाताचा पंजा वरच्या बाजूला असावा आणि बोटे अर्धवट उघडी असावी.
- पाय सरळ पसरलेला अवस्थेत ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना स्पर्श करतील व चवडे बाहेरच्या बाजूस झुकतील अशी पायांची स्थिती असू द्या.
- डोळे मिटा श्वास अगदी हळूहळू घेत रहा.
- आता अशी कल्पना करा कि आपले संपूर्ण शरीर हलके होतेय आपल्या शरीरात कुठलाच त्राण नाही, आपल्याला कुठलीच वेदना आपल्याला होत नाही.
- हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. परम्यात्म्याचे ध्यान करा.
साधारणपणे १० ते १५ मिनिटांपर्यंत असे ध्यान करा. या मुळे विश्रांती व अतीव अश्या सुखाचा अनुभव येतो. जे लोक मानसिक तणाव व हृदयरोगाने पीडित आहेत त्यांनी दररोज नियमित शवासन करावे.
फायदे:(Benefits of Savasana )
- या आसनामध्ये शरीराबरोबरच मनालाही शांती प्राप्त होते.
- या आसनामुळे शक्ती व जोम प्राप्त होते.
- निद्रानाश, रक्तदाब, ग्रंथीची दुर्बलता व पोटात वात (गॅस) धरणे इत्यादी विकार या आसनामुळे दूर होतात.
- हृदयविकार आणि मनोविकाराने पीडित असणाऱ्या लोकांना त्वरित आराम मिळतो.
- या आसनामुळे सर्व शरीरात शुद्ध रक्ताचा संचार होतो. शरीरात एक नवीन जोम निर्माण होतो.
- हे आसन नियमित केल्याने तुम्ही आपल्या मनावर ताबा मिळवू शकता.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏