Skip to main content

आयुर्वेदिक वनऔषधी- गुळवेलाचे फायदे | Gulvel

गुळवेल

या कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवणे आणि ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. मागील काही ब्लॉग मध्ये आपण पद्मासन, सिद्धासन, सर्वांगासन या सारखी अनेक अशी योगासने बघितली कि ज्यामुळे आपल्या अंतर आणि बाह्य शरीराला भरपूर व्यायाम मिळून आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते. आता आपण अश्या एका वनऔषधी बद्दल माहिती जाणून घेऊयात कि ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास आणि ती बळकट होण्यास मदत होईल. गुळवेल, गुळवेल ला आयुर्वेदामध्ये अमृतवेल सुद्धा म्हणतात. गुळवेलाच्या सेवनामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत होते. सर्दी, ताप खोकला यासारख्या आजारांशी लढण्याची ताकत आपल्याला मिळते. गुळवेल मध्ये असलेल्या इम्युनोमॉडेलरी गुणधर्मामुळे आपली कमकुवत झालेली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. गुळवेलीमध्ये फॉस्परस, कॅलशियम, प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम असे अनेक शरीर उपयोगी औषधीय घटक आहेत. या वनौषधीच्या सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते त्यामुळे मधुमेह या सारखे आजार होण्याचा धोका टळतो. येथे आपण गुळवेल कसा ओळखावा, गुळवेलचा काढा कसा बनवावा आणि त्याचे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात. जर आपल्याला ताजी गुळवेल उपलब्ध नाही झाली तर आयुर्वेदिक औषधींच्या दुकानावर गुळवेलीची पावडर सुद्धा उपलब्ध असते, त्यापासून सुद्धा आपल्याला फायदा होतो. (Gulvel benefits in marathi)
 
Gulvel


गुळवेल कसा ओळखावा?

गुळवेलची पाने हि हिरवीगार असून त्यांचा आकार हा हृदयाकृती असतो. या पानांची देठ लांब असून याची पाने हाताला गुळगुळीत लागतात. या वेलीचे खोड हे बोटाएवढे जाड असून त्याची साल हि पातळ असते. या खोडावर लहान लहान छिद्र असल्यासारखी दिसतात व ते खरबडीत असते. गुळवेलचे खोड कापल्यास त्यातील आतला भाग गोल चक्राकार दिसतो. अत्यंत कमी पाणी असलेल्या ठिकाणी सुद्धा हि वेल जगते म्हणून हिला अमृतवेल सुद्धा म्हणतात. हि वेल जर कडू लिंबाच्या झाडावर वाढलेली असेल तर तिचे आयुर्वेदिक गुणधर्म अधिक वाढतात. 

गुळवेलचा काढा कसा बनवावा?

गुळवेलीचे खोड प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. आपल्या बोटाच्या दोन कांड्या एवढे त्याचे दोन तुकडे घ्यावे. हे तुकडे चार कप पाण्यामध्ये उकळायला टाकावे. चार कप पाण्याचे एक कप पाणी होईपर्यंत याला उकळूद्या. आता हा काढा थंड झाल्यावर त्याला गाळून पिऊ शकता. अत्यंत गुणकारी असलेला हा काढा चवीला कडसर आहे. आयुर्वेदिक औषधींच्या दुकानांमध्ये गुळवेल काढा, गोळ्या आणि त्याची पावडर उपलब्ध आहे. या काढ्याचे किंवा मिळणाऱ्या औषधींचे सेवन करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

गुळवेलचे फायदे 

  1. गुळवेलच्या सेवनाने आपली पचन शक्ती सुधारते. 
  2. गुळवेलच्या सेवनाने ऍसिडिटी चा त्रास दूर होतो. 
  3. काविळी मुळे आलेला थकवा किंवा अशक्तपणा या काढ्याच्या सेवनाने दूर होतो. तसेच गुळवेलचा काढा मधात दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास भरपूर अराम पडतो. 
  4. गुळवेलच्या काढ्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.  
  5. स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान ह्या काढ्याचे सेवन आरामदायी ठरते. 
  6. हातापायांची जळजळ होत असल्यास या वेलीची पाने कुटून हात आणि पायांना लावल्यास होणारी जळजळ कमी होते. 
  7. कान दुखत असल्यास गुळवेलच्या पानाचा रस काढावा व त्याचे दोन थेंब कानात टाकावे लगेच अराम मिळतो. 
  8. गुळवेल हि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. गुळवेलच्या पानांचा रस मधात घालून डोळ्यांना लावल्यास डोळ्यांचे बरेच आजार कमी होतात. तसेच गुळवेलच्या सेवनाने डोळ्यांना असलेला नंबर सुद्धा निघून जाण्यास मदत होते. 
  9. गुळवेलच्या फळांचा रस जर चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावर येणारी पुरळ नाहीशी होतात तसेच चेहरा तजेलदार दिसतो. 
  10. गुळवेलच्या सेवनाने खोल्याला सुद्धा अराम मिळतो. 

टीप: मधुमेहाची औषधी चालू असल्यास गुळवेलचे सेवन करू नये. तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेलचे सेवन करू नये. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...