या आसनामध्ये खाली डोके वर पाय अशी उलटी शरीर अवस्था केली जाते म्हणून या आसनाला 'विपरीतकरणी मुद्रा'(Viprita Karni Mudra) असे म्हणतात.
कृती:
- आधी जमिनीवर पाठीवर झोपा.
- नाकावाटे श्वास आत घेऊन तो रोखून धरा.
- आता दोन्ही पाय हळूहळू वर उचला. दोन्ही हातानी नितंबाना आधार द्या.
- हातांचे कोपरे जमिनीवर टेकवा आणि स्थिर व्हा.
- आता श्वासोश्वास घेत राहा.
- आपल्या पायांच्या अंगठ्यावर दृष्टी स्तिर करा आणि काही वेळ याच याच स्तिथीत स्थिर राहा.
सुरुवातीला हि आसनमुद्रा एकच मिनिट करा नंतर हळू हळू सरावानंतर हि मुद्रा दहा मिनिटापर्यंत करता येते.
टीप : ज्यांना उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योजगासनांचा अभ्यास करावा.
विपरीतकरणी मुद्राचे फायदे (Benefits of Viprita Karni Mudra):
- या आसनाच्या सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो.
- कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे आसन फायदेशीर आहे.
- दृष्टी तेज बनते.
- पायावरील सूज कमी होते.
- या आसनाच्या सरावाने कंठ मधुर व सुरेल बनतो.
- या आसनाच्या सरावाने गळवे, चेहऱ्यावर पुरळ उठणे, खरूज होणे यांच्या सारखे रक्तदोषजन्य रोग बरे होतात.
- या आसनाच्या सरावामुळे सर्व शरीरात शुद्ध रक्त उत्तम तऱ्हेने खेळवले गेल्याने शरीर सुंदर, आकर्षक व ताकतवर बनते.
- या आसनाच्या सरावाने केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
- स्री, पुरुष, अबालवृद्ध या सर्वांसाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏