'शीर्ष' म्हणजे 'मस्तक' किंवा 'डोके'. या आसनामध्ये सर्व शरीराचा भार केवळ आपल्या डोक्यावर तोलून धरावा लागतो, म्हणून या आसनास 'शीर्षासन' असे म्हणतात. शीर्षासनाला सर्व आसनांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. या आसनाच्या नियमित सरावामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच स्वप्नदोषाचा त्रास नाहीसा होतो. या आसनाची कृती व त्यापासून मिळणारे फायदे( shirshasana benefits in marathi ) या बद्दल सर्व माहिती आपण या ठिकाणी मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. pic credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Salamba_Sirsasana_-_Supported_Headstand.jpg कृती: प्रथम आपले आसन जमिनीवर पसरवा. दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफून जमिनीवर ठेवा. आता बोटांची गुंफण व हाताच्या कोपरांमध्ये डोके टेकवा. बोटांची गुंफण डोक्याच्या मागील बाजूस येऊ द्या. नंतर पायांचे गुडघे हाताच्या कोपरापर्यंत सरकवून हळू हळू कंबर उचलून पायही छताकडे उंच करा. पाय छताकडे नेत असताना गुडघे मुडपून पाय हळूहळू वर न्या व नंतर पाय ताठ करा. पाय गुडघ्यातून न वाकवता सरळ छताकडे ताठ ठेवण्याचा प्रयत...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...