Skip to main content

शीर्षासन | shirshasana | कृती व फायदे

'शीर्ष' म्हणजे 'मस्तक' किंवा 'डोके'. या आसनामध्ये सर्व शरीराचा भार केवळ आपल्या डोक्यावर तोलून धरावा लागतो, म्हणून या आसनास 'शीर्षासन' असे म्हणतात. शीर्षासनाला  सर्व आसनांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. या आसनाच्या नियमित सरावामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच स्वप्नदोषाचा त्रास नाहीसा होतो. या आसनाची कृती व त्यापासून मिळणारे फायदे(shirshasana benefits in marathi) या बद्दल सर्व माहिती आपण या ठिकाणी मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. 
   
shirshasana
pic credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Salamba_Sirsasana_-_Supported_Headstand.jpg



कृती:

  •  प्रथम आपले आसन जमिनीवर पसरवा. दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफून जमिनीवर ठेवा.
  • आता बोटांची गुंफण व हाताच्या कोपरांमध्ये डोके टेकवा. बोटांची गुंफण डोक्याच्या मागील बाजूस येऊ द्या. नंतर पायांचे गुडघे हाताच्या कोपरापर्यंत सरकवून हळू हळू कंबर उचलून पायही छताकडे उंच करा.
  • पाय छताकडे नेत असताना गुडघे मुडपून पाय हळूहळू वर न्या व नंतर पाय ताठ करा.
  • पाय गुडघ्यातून न वाकवता सरळ छताकडे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • हे आसन करताना घाई करू नका.
  • पायाचे चवडे छताकडे  ताणलेल्या अवस्थेत  ठेवा. श्वासोच्छवास चालू ठेवा. नंतर पाय हळूहळू खाली आणा. सुरुवातीस काही दिवस पंधरा सेकंद या स्तिथीत राहा.
  • पोट रिकामे असेल तेव्हाच हे आसन करावे.
  • सकाळ संध्याकाळ अश्या दोन्ही वेळेस हे आसन करता आल्यास अति-उत्तम.
  • हे आसन करताना शरीराला ताण येऊ देऊ नका.
  • जेव्हा शीर्षासनाच्या पूर्णावस्थेत याला तेव्हा धीम्या गतीने श्वास घ्या.
  • तोंडाने श्वास घेऊ नका. सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊन हे आसन करा किंवा दुसऱ्याच्या मदतीने हे आसन  करा. 
  • नंतर हळूहळू सरावानंतर अर्ध्या तासापर्यंत या आसन स्तिथीत राहू शकता.
    उन्हाळ्यात हे आसन जास्त वेळ करू नये. हिवाळ्यात वातावरण थंड झाल्यावर तुमच्या इच्छेप्रमाणे जमेल तेवढ्यावेळ हे आसन करावे. जास्त वेळ या आसनावस्थेत राहायचे असल्यास डोळे बंद करावीत. असे केल्याने डोळ्यावर ताण पडणार नाही व मनाची एकाग्रता साधेल. आसन पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिटे अराम करावा आणि नंतर एक कप दूध किंवा हलकासा नाश्ता करावा. या आसनानंतर पोटामध्ये काही ना काही पचनसुलभ हलका आहार घेणे जरुरीचे आहे. 

महत्वाची नोंद: शीर्षासनानंतर शरीराला अराम देण्यासाठी शवासन करणे अत्यंत आवश्यक आहे. 

फायदे:

  • शक्तिसंचयासाठी या आसनाचा खूप उपयोग होतो. हे आसन म्हणजे शक्तीचा स्रोत आहे. या आसनाच्या नित्य सरावामुळे शरीरात नवी शक्ती नवा जोम निर्माण हॊतॊ. 
  • या आसनामुळे स्वप्नदोष नाहीसा होतो. या आसनामुळे वीर्यशक्तीचे ओजसशक्तीमध्ये रूपांतर होते. 
  • हे आसन गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध असल्याने हे आसन  केल्याने मेंदूकडे रक्त व प्राण खेचले जातात. त्यामुळे ज्ञानेंद्रिये व त्यांना नियंत्रित करणारी मेंदूतील केंद्रें अधिक कार्यक्षम बनतात. 
  • या आसनामुळे मनोबल वाढते, स्मरणशक्ती तीव्र बनते आणि कुंडलिनी जागृत होते. 
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे सर्व प्रकारचे रोग बरे होतात. हे आसन पाचक रस वाढवते व जठराग्नी प्रज्वलित करते. 
  • या आसनामुळे डोळे, नाक, कान, गळ्याचे विकार, मधुमेह व दम्यासारखे विकार दूर होतात . 

महत्वाची सूचना:
     शिर्षासनापासून होणारे फायदे पाहून आणि अति उत्साहात येऊन जर तुम्ही हे आसन जास्त वेळ केले तर नुकसान होण्याची जास्त भीती असते. कारण शरीराला मर्यादेपेक्षा जास्त ताण दिला तर फायदा होण्या ऐवजी तोटा होण्याचीच जास्त शक्यता असते. नाक कान  घसा किंवा गळ्यात काही विकृती असेल, निद्रानाशाचा त्रास होत असेल किंवा दृष्टी कमकुवत असेल तर डोक्यावरील आसने करू नयेत. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...