Skip to main content

वृक्षासन- एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय | Vrikshasana

वृक्षासन

    पायावर उभे राहून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन आहे, हे आसन करण्यास अत्यंत सोपे असून या आसनात शरीराचा आकार वृक्षाप्रमाणे म्हणजेच झाडाप्रमाणे दिसत असल्यामुळे या आसनाला वृक्षासन(Vrikshasana) असे म्हणतात. या आसनालाच इंग्रजी मध्ये ट्री पोझ (tree pose) असे म्हणातात. या असणामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा भार एका पायावर तोलल्या जातो तसेच हे आसन करताना आपले संपूर्ण शरीर ताणले जाते व आपल्या हातापायांच्या साध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. स्ट्रेचिंग करण्यासाठी वृक्षासन हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. या आसनामुळे आपले हात, पाय, मांड्या व कंबर यांचा भरपूर व्यायाम होतो. हे आसन एकाग्रता वाढविण्यासाठी खूप मदतगार आहे. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो, असे करताना डोक्यातील इतर विचार आपोआपच बाजूला सारल्या जातात त्यामुळे मानसिक स्थैर्य साधल्या जाते. याचाच उपयोग स्मरणशक्ती वाढण्या साठी होतो. चला तर मग वृक्षासनाची कृती व त्यापासून मिळणारे संपूर्ण फायदे या बद्दल मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Vrikshasana steps and benefits information in marathi) 
Vrikshasana

वृक्षासन
pic Credit-https://pixahive.com/photo/yoga-by-female-in-park/

कृती:

  • प्रथम उजव्या पायावर उभे राहा आणि डाव पाय गुडघ्यात दुमडवून पायाची टाच उजव्या जांघेत ठेवा.
  • हि क्रिया करताना जर एका पायावर शरीराचा तोल सांभाळणे अवघड जात असेल तर भिंतीचा आधार घ्या.
  • दोन्ही तळहात जुळवून आपल्या छातीपाशी आणा. 
  • आता आकृतीत दाखविल्याप्रमाणे दोन्ही तळहात जुळवून  छातीसमोरून डोक्यावर लांबवा.
  • हात वर नेतांना दीर्घ श्वास घ्या. 
  • दोन्ही हात वर ताठ ठेवा. हात कोपरांत वाकू देऊ नका. पाठीचा कणा ताठ ठेवा. 
  • नजर सरळ समोर एका ठिकाणी स्थिर करा. 
  • आता हळू हळू दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे चालू राहू द्या. साधारणतः दहा सेकंदापर्यंत या स्तिथीत राहा.
  • आता हळू हळू श्वास सोडत दोन्ही हात खाली आना, व पाय सुद्धा खाली घ्या. 
  • काही वेळच्या विश्रांती नंतर हीच क्रिया दुसऱ्या पायाने परत करा. 
  • हे आसन आपल्याला वेळ मिळेल तसे दिवसातून चार ते पाच वेळा करता येऊ शकते. 

फायदे:

  1. हे आसन एकाग्रता वाढविण्यासाठी खूप मदतगार आहे. 
  2. या आसनाच्या नियमित सरावाने पायाची बोटे, गुढघे, हाताचे कोपरे वैगेरे अवयवांमधील नाड्यांमध्ये रक्त पुरवठा सुरळीत  होतो. 
  3. या आसनात आपले हात, पाय, कंबर, पाठीचा कणा, छाती या सर्वांवर ताण पडून त्यांचा भरपूर व्यायाम होतो. 
  4. या आसनाच्या नित्य सरावामुळे पाय लवचिक बनतात. 
  5. छाती भरदार बनते व शरीराला तोल येतो. 
  6. या आसनामुळे शरीराच्या प्रत्येक सांध्याला पुरेसा व्यायाम मिळतो.
  7. या आसनाच्या सरावाने सायटिका सारखा त्रास बरा होण्यास मदत मिळते. 
टीप: ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...