Skip to main content

Posts

ड्रॅगन फ्रुट-आरोग्यवर्धक फळ खाण्याचे फायदे -Dragon Fruit

 ड्रॅगन फ्रुट(-Dragon Fruit)  आज आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती जाणून घेऊयात. मूळच सेंट्रल अमेरिकेमध्ये सापडणार हे फळ आता जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज मिळते. हे फळ हायलोसिरीअस (Hylocereus)  नावाच्या कॅटकस प्रकारांमधील आहे. या मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः त्यात दोन सामान्य प्रकार सगळीकडे मिळतात ते म्हणजे हायलोसेरियस अँडाट्स (Hylocereus Undatus) जे आतून पांढरे असते आणि हायलोसेरियस कोस्टारिसेंसीस जे आतमधून लाल किंवा गुलाबी असते.  ड्रॅगन फ्रुट हे नाव त्या फळाच्या बाह्य आकारावरून त्याला मिळाले आहे.  हे फळ त्याच्या दिसण्यावरून प्रसिद्ध तर आहेच त्याच बरोबर ते त्याच्या विशिष्ट चव आणि त्यात असणाऱ्या विविध पौष्टिक जीवनसत्वाबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात.  जीवनसत्वे : जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स, ड्रॅगन फ्रुट मध्ये क जीवनसत्व(व्हिटॅमिन सी ) विपुल प्रमाणात आहे, जे अँटिऑक्सिडन असल्यामुळे त्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने आपली त्वचा सुद्...

हस्तमुद्रा म्हणजे काय? ५ प्रकार, फायदे आणि योग्य पद्धत

हस्तमुद्रा म्हणजे काय? प्रकार, फायदे आणि योग्य पद्धत | Hasta Mudra in Marathi लेखक: योगेश विषय: योग, हस्तमुद्रा आणि ध्यान हस्तमुद्रा म्हणजे काय? आतापर्यंत आपण विविध योगासने आणि त्यांचे फायदे जाणून घेतले आहेत. या लेखात आपण हस्तमुद्रा म्हणजे काय, हस्तमुद्रांचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्यांचा सराव कसा करावा याबद्दल सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. योगाच्या परंपरेमध्ये हातांच्या आणि बोटांच्या विशिष्ट स्थितींना हस्तमुद्रा असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये ‘हस्त’ म्हणजे हात आणि ‘मुद्रा’ म्हणजे विशिष्ट संकेत किंवा स्थिती असा साधारण अर्थ घेतला जातो. ध्यान, प्राणायाम आणि योगाभ्यासाच्या वेळी अनेक हस्तमुद्रांचा उपयोग केला जातो. नियमित आणि योग्य पद्धतीने केलेला सराव मन शांत ठेवण्यास, एकाग्रता वाढवण्यास आणि ध्यानाचा अनुभव अधिक चांगला होण्यास मदत करू शकतो. पंचतत्त्व आणि हस्तमुद्रा योगाच्या पारंपरिक विचारसरणीनुसार मानवी शरीराचा संबंध पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांशी जोडला जातो. हस्तमुद्रांच्या पारंपरिक संकल्पनेत हाताच्या बोटांचा या पंचतत्त्वांशी संबंध मानला जातो. त्यामुळे बोटांच...

उष्माघात म्हणजे काय? लक्षणे, उपाय आणि बचाव

उष्माघात म्हणजे काय? (What is Heat Stroke?) लेखक: डॉ. विशाल राठोड | byyogesh.com नमस्कार, मी डॉ. विशाल राठोड . सर्वप्रथम byyogesh.com  ब्लॉगच्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक स्वागत. उन्हाळ्यात वाढणारे तापमान आणि प्रखर उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. या विषयाबद्दल योग्य आणि आवश्यक आरोग्यविषयक माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ब्लॉगच्या निर्मात्याने मला उष्माघात (Heat Stroke) या विषयावर माहिती देण्याची विनंती केली. या लेखामध्ये आपण उष्माघात म्हणजे काय, त्याची प्रमुख लक्षणे, उष्माघाताचा संशय असल्यास प्राथमिक काळजी, प्रतिबंधात्मक उपाय आणि उन्हाळ्यातील आयुर्वेदिक आहार-विहार याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात (Heat Stroke) हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढल्यामुळे होणारा गंभीर वैद्यकीय आजार आहे. अतिशय उष्ण वातावरणात दीर्घकाळ राहणे, प्रखर उन्हात जास्त शारीरिक श्रम करणे किंवा शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी पडणे यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. उष्माघातामध्ये शरीराचे तापमान अत्यंत वाढू शकते आणि त्याचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड आ...

कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

 सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे : आपण या लेखामध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. या क्रियेला आयुर्वेदामध्ये उषःपान असे म्हटले जाते.   ककचंडीश्वर_कल्पतंत्र" या आयुर्वेदिक ग्रंथात रात्रीच्या पूर्वार्धात पाणी पिणे विषारी असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री प्यालेले पाणी ‘दुधा’सारखे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आणि सकाळी (सुर्योदयापूर्वी) प्यायलेले पाणी आईच्या दुधाइतकेच फायदेशीर आहे असे म्हणतात . उषःपान या शब्दाची फोड केल्यास उषा म्हणजे सकाळ आणि पान म्हणजे पाणी असा होतो. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आजारापासून वाचवता येते. तसेच आपल्या शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यासाठी ह्या क्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होतो. सध्या बहुतेक लोकांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे वजन कमी कसे करावे? याचे सोपे उत्तर म्हणजे उषःपान. नियमित रोज सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास उषःपान म्हणजे घरच्या घरी केलेली विनामूल्य वॉटर थेरेपी.  Image by: Photo...

ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे? फायदे आणि योग्य पद्धत

ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे? फायदे आणि योग्य पद्धत आज आपण ध्यान म्हणजे काय, ध्यान कसे करावे आणि ध्यान साधनेचे संभाव्य फायदे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Image Credit : https://pixahive.com/photo/meditation/ आपल्या मनात दिवसभर अनेक विचार येत असतात. कामाचा ताण, भविष्याची चिंता, कुटुंबाची काळजी, आर्थिक किंवा वैयक्तिक समस्या यामुळे मन सतत व्यस्त राहू शकते. अशा वेळी काही वेळ शांत बसून वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे मनाला विश्रांती देण्यास मदत करू शकते. ध्यान (Meditation) म्हणजे मनाला एखाद्या गोष्टीवर—जसे की श्वास, मंत्र, आवाज किंवा वर्तमान क्षणातील अनुभव—जाणीवपूर्वक केंद्रित करण्याचा सराव. ध्यानाचा उद्देश मनात येणारे प्रत्येक विचार जबरदस्तीने थांबवणे नसून, विचारांकडे शांतपणे पाहून पुन्हा लक्ष वर्तमान क्षणाकडे आणणे हा आहे. संशोधनानुसार mindfulness आणि meditation चा सराव तणाव, चिंता आणि काही झोपेच्या समस्यांमध्ये मदत करू शकतो . मात्र त्याचे परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. ध्यान म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे झाल्यास, ध्यान म्हणजे मनाला एका ठराविक गोष्टीवर...

Purvottanasana information in Marathi | पूर्वोतानासन मराठी माहिती

पूर्वोतानासन  पूर्वोतानासन, हे आसन करताना आपल्या शरीराचा धडाच भाग वर उचल्या जातो. येथे पूर्व म्हणजेच पूर्व  दिशा नसून आपल्या शरीराचा वरील भाग आणि उत्तानासन म्हणजेच वर उचलणे किंवा खेचून धरणे असा होतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला जीवनातील दैनंदिन ताण तणावापासून मुक्ततता मिळते. तसेच  थॉयरॉईड(Thyroid) ग्रंथीचे कार्य सुधारते   व  आपली शारीरिक कमजोरी दूर  होऊन शरीरात नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. या आसनालाच इंग्रजी मध्ये Upword Plank Pose किंवा East Streaching Pose असे सुद्धा म्हणतात.  पूर्वोतानासन या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जाणून घेऊयात. (Purvottanasan information in marathi) Image Source :  https://pixahive.com/photo/east-streching-pose-purvottanasana/ कृती : आपल्या नियमित योग करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय सरळ लांबवून बसा.  बसलेले असताना आपल्या पाठीचा कणा सुद्धा ताठ ठेवा.  आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील असे चिपकवून राहू द्या.  आत...

Utkatasana Information in Marathi | उत्कटासन मराठी माहिती | Chair Pose

उत्कटासन  या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला उत्साह व जोम वाढविण्यास मदत करतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ (Chair Pose) असे म्हणतात. या आसनाची कृती व फायदे या बद्दल सविस्तर मराठी माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Utkatasana Information in Marath) Image source:  https://pixahive.com/photo/utkatasana-chair-pose/ कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.(साधारणतः ७ ते ९ इंच एवढे अंतर राहूद्या )  या नंतर आपले दोन्ही हात समोर लांबवून आपल्या खांद्याला समांतर राहतील असे राहू द्या.  आपले तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे.  आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका.  असे करताना आपले नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच आपले गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...