ध्यान (Meditation )
आज आपण ध्यान म्हणजे काय? , ध्यान साधना कशी करावी तसेच ध्यान साधना करण्याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत. एका नवीन अध्ययनानुसार मानवी मनात दिवसाला ६००० वेगवेगळे विचार येतात. ज्यावर आपला काहीच निर्बंध नसतो. हे विचार आपल्या काही कामाचे सुद्धा नसतात. या मध्ये चिंता, काळजी, भविष्यात काय होईल याची भीती हे सर्व काही असते. आणि या सतत च्या निर्माण होणाऱ्या विचारणामुळे आपण विविध आजारांना नकळतच आमंत्रण देतो.
ध्यान साधना केल्याने आपण हे मनात येणारे सर्व विचार थांबवू शकतो असे नाही परंतु त्यावर आपण ताबा मिळवू शकतो हे नक्कीच. तसेच नियमित ध्यान (Meditation) केल्याने नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारात बदलता येते. नियमित ध्यान साधना आपल्या मेंदू मध्ये एक अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते व त्यामुळे आपले मन शांत होते त्याचे फलस्वरूप आपले शारीरिक विकार/आजार दूर होतात. चंचल मनाला स्थिरता मिळाल्यामुळे आपली निर्णय क्षमता सुधारते, आपली एकाग्रता (concentration) वाढते, आपल्या स्मरण शक्ती वाढते. असे सर्व सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात.
परंतु हे सर्व बदल काही एक किंवा दोन दिवसांमध्ये होत नसतात त्यासाठी आपल्याला ध्यान/Meditation रोज करावे लागते. आपले रोज चे पाच ते दहा मिनिटे आपले संपूर्ण आयुष्य बदलवू शकते. ध्यान करण्यासाठी आपल्याला कुठल्या साधनांची गरज पडत नाही, तसेच आपल्याला त्या साठी काही खर्च सुद्धा येत नाही. आपण आपल्यासाठी काढलेले हे पाच मिनिटे आपले संपूर्ण आयुष्य बदलवू शकतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास ध्यान म्हणजे आपल्या आत्म्याचा अंतरात्म्याशी झालेला संवाद म्हणजेच ध्यान होय. ध्यान म्हणजे आपल्या मनात उठणाऱ्या असंख्य विचारांना शांत करणे. ध्यान करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. पुढे आपण ध्यान कसे करावे हे बघुयात.
![]() |
| Image Credit :https://pixahive.com/photo/meditation/ |
ध्यान कसे करावे ?
ध्यान करण्यासाठी निवडलेली जागा हि स्वछ आणि शांत असावी.
त्या ठिकाणी मंद प्रकाश आणि खेळती हवा असावी. गडद प्रकाशामध्ये आपले मन लवकर एकाग्र होत नाही.
आता ध्यान करण्यासाठी सुखासनात बसावे. तसे शक्य नसल्यास आराम खुर्ची मध्ये बसले तरी चालेल.
सुखासन मध्ये बसल्यानंतर आपले तळहात पद्ममुद्रा आपल्या मांडीवर ठेवावे. जर खुर्ची वर बसले असाल तर आपले हात खुर्चीच्या हातावर ठेवावे.
आता डोळे बंद करून आपले लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करावे. असे करताना आपला श्वासोश्वास नियमित चालू ठेवावा.
आपण शवासण मध्ये ज्याप्रमाणे पायापासून ते डोक्यापर्यंत आपले अवयव शिथिल करतो त्याच प्रमाणे येथे उलट म्हणजे आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत आपले अवयव शिथिल करत जावे. आपले कपाळ, डोळे, कान, नाक, मान, असा क्रम लावत हात, पाय, पोट असे सर्व अवयव शिथिल करावे.
या नंतर आपले ध्यान एकाग्र करावे आपले मन फार चंचल असते ते फार भटकते त्याला एका ठिकाणी स्थिर करावे.
या स्थितीमध्ये १० ते १५ मिनिटे राहावे. आता हळूहळू डोळे उघडावे. आपल्या हातापायांची किंचित अशी हालचाल करावी. एकदम उठून उभे राहू नये. कारण जर चांगले ध्यान लागले (Deep Meditation) तर आपला रक्तदाब कमी होतो आणि ह्रदयाचे ठोके सुद्धा मंदावतात. म्हणून ध्यान करून झाल्यावर सावकाश उठावे.
ध्यान करण्याचे फायदे
स्मरण शक्ती वाढते - नियमित ध्यान केल्याने आपले चंचल मन एकाग्र होते. नियमित ध्यान साधनेमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते व आपली स्मरणशक्ती आपोआपच वृद्धिंगत होते.
मन आनंदी राहते - ध्यान केल्यामुळे आपल्या मध्ये एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो व त्याचेच फलस्वरूप म्हणजे आपले मन नेहमी आनंदी राहते.
कार्यक्षमता वाढते- नियमित ध्यान केल्यामुळे आपला मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होतो, शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होते. आपला उत्साह वाढतो आणि आपली कार्यक्षमता प्रचंड प्रमाणात वाढते.
वाईट सवयी दूर होतात- मन प्रसन्न शांत असल्यामुळे आपल्याला कुठल्याही वाईट सवयी लागत नाही आणि आपल्याला काही वाईट सवयी असल्यास त्या हळू हळू दूर व्हायला लागतात.
आजार बरे होतात- सर्व आजार हे मानसिक तणावामुळे निर्माण होतात. परंतु नियमित ध्यानाचा सराव केल्यास आपला मानसिक ताण हळू हळू कमी होतो. एक अध्यात्मिक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. नियमित ध्यान केल्यामुळे रक्तदाब म्हणजे बीपी, शुगर, थायरॉईड यासारखे आजार पूर्णपणे बरे होतात.
महत्वाची माहिती - आपल्याला पद्ममुद्रा आणि शवासन बद्दल माहिती नसल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पद्ममुद्रा => https://www.yogatoday.in/2020/05/padmasana-steps-and-benefits.html
शवासन => https://www.yogatoday.in/2020/06/shavasana-steps-and-benefits.html

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏