Skip to main content

Posts

ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे? फायदे आणि योग्य पद्धत

ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे? फायदे आणि योग्य पद्धत आज आपण ध्यान म्हणजे काय, ध्यान कसे करावे आणि ध्यान साधनेचे संभाव्य फायदे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Image Credit : https://pixahive.com/photo/meditation/ आपल्या मनात दिवसभर अनेक विचार येत असतात. कामाचा ताण, भविष्याची चिंता, कुटुंबाची काळजी, आर्थिक किंवा वैयक्तिक समस्या यामुळे मन सतत व्यस्त राहू शकते. अशा वेळी काही वेळ शांत बसून वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे मनाला विश्रांती देण्यास मदत करू शकते. ध्यान (Meditation) म्हणजे मनाला एखाद्या गोष्टीवर—जसे की श्वास, मंत्र, आवाज किंवा वर्तमान क्षणातील अनुभव—जाणीवपूर्वक केंद्रित करण्याचा सराव. ध्यानाचा उद्देश मनात येणारे प्रत्येक विचार जबरदस्तीने थांबवणे नसून, विचारांकडे शांतपणे पाहून पुन्हा लक्ष वर्तमान क्षणाकडे आणणे हा आहे. संशोधनानुसार mindfulness आणि meditation चा सराव तणाव, चिंता आणि काही झोपेच्या समस्यांमध्ये मदत करू शकतो . मात्र त्याचे परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. ध्यान म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे झाल्यास, ध्यान म्हणजे मनाला एका ठराविक गोष्टीवर...

Purvottanasana information in Marathi | पूर्वोतानासन मराठी माहिती

पूर्वोतानासन  पूर्वोतानासन, हे आसन करताना आपल्या शरीराचा धडाच भाग वर उचल्या जातो. येथे पूर्व म्हणजेच पूर्व  दिशा नसून आपल्या शरीराचा वरील भाग आणि उत्तानासन म्हणजेच वर उचलणे किंवा खेचून धरणे असा होतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला जीवनातील दैनंदिन ताण तणावापासून मुक्ततता मिळते. तसेच  थॉयरॉईड(Thyroid) ग्रंथीचे कार्य सुधारते   व  आपली शारीरिक कमजोरी दूर  होऊन शरीरात नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. या आसनालाच इंग्रजी मध्ये Upword Plank Pose किंवा East Streaching Pose असे सुद्धा म्हणतात.  पूर्वोतानासन या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जाणून घेऊयात. (Purvottanasan information in marathi) Image Source :  https://pixahive.com/photo/east-streching-pose-purvottanasana/ कृती : आपल्या नियमित योग करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय सरळ लांबवून बसा.  बसलेले असताना आपल्या पाठीचा कणा सुद्धा ताठ ठेवा.  आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील असे चिपकवून राहू द्या.  आत...

Utkatasana Information in Marathi | उत्कटासन मराठी माहिती | Chair Pose

उत्कटासन  या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला उत्साह व जोम वाढविण्यास मदत करतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ (Chair Pose) असे म्हणतात. या आसनाची कृती व फायदे या बद्दल सविस्तर मराठी माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Utkatasana Information in Marath) Image source:  https://pixahive.com/photo/utkatasana-chair-pose/ कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.(साधारणतः ७ ते ९ इंच एवढे अंतर राहूद्या )  या नंतर आपले दोन्ही हात समोर लांबवून आपल्या खांद्याला समांतर राहतील असे राहू द्या.  आपले तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे.  आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका.  असे करताना आपले नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच आपले गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार...

Benefits of Trikonasana | त्रिकोणासन चे फायदे

या आसनाचा सराव करताना आपल्या शरीराची आकृती त्रिकोणासारखी बनते म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे नाव पडले आहे. या आसनाचा सराव करताना आपले शरीर तीन कोनांमध्ये विभागले जाते. या आसनाच्या सरावामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबीचे विघटन होऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते. त्रिकोणासनापासून मिळणारे विविध फायदे व त्याची कृती या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(Trikonasana information and benefits in Marathi) कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर सरळ उभे राहा.  आपले दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर असे चिपकून राहू द्या.  उभे असताना आपल्या दोन्ही पायामधे काही अंतर सोडा. साधारणतः ७५ से.मी.एव्हडे .  आता आपले दोन्ही हात वर उचलून आपल्या खांद्यांना सरळ रेषेत समांतर असे ठेवा.  या स्थितीत आपले हाताचे तळवे हे जमिनीकडे झुकलेले असावे.  आता आपल्या डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा.  असे करत असताना आपला उजवा हात सर...

उत्थित हस्त पादअंगुष्ठासन चे फायदे | Utthita Hasta Padangusthasana Benefits

  उत्थित हस्त पादअंगुष्ठासन  उत्थित हस्त पादअंगुष्ठासन हे आसन पायावर उभे राहून करण्याच्या प्रकारातील आसन आहे. येथे उत्थित म्हणजे वर उचलणे, हस्त म्हणजे हात, पाद किंवा पद म्हणजे पाय आणि अंगुष्ठ म्हणजे अंगठा. तसेच या आसनाला इंग्रजी मध्ये Extended Hand-To-Big-Toe-Pose असे म्हणतात. या आसनाचा सराव केल्याने शारीरिक व मानसिक संतुलन बनून राहते तसेच आपली एकाग्रता वाढते. उत्थित हस्त पादअंगुष्ठासन ची कृती आणि फायदे या बद्दल माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (utthita hasta padangusthasana benefits and steps information in marathi) image source:  https://pixahive.com/photo/utthita-hasta-padangustasana-extended-hand-to-big-toe-2/ कृती:  सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर आपल्या दोन्ही पायावर सरळ उभे राहा.  आता एक खोल श्वास घेऊन आपला उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पोटाजवळ आणा.  आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि आकृतीत दाखवल्या प्रमाणे हळू हळू पाय डोक्याकडे वर उचला.  हि कृती करताना आपला तोल जाणार नाही याची दक्षता घ्या....

शशांकासन नैराश्य दूर करण्यास मदत करते | Shashankasana Marathi Information

शशांकासन  कृती: "शशांक" हा एक संस्कृत शब्द असून त्याचे "ससा" आणि "चंद्र" असे दोन अर्थ होतात. शशांकासन करताना आपल्या शरीराचा आकार एखाद्या सश्याप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला शशांकासन असे म्हणतात. तसेच या आसनाच्या सरावामुळे आपले मन चंद्राप्रमाणे शीतल आणि शांत होते. या आसनाचा नियमित सराव नैराश्य दूर करण्यास मदत करते. हे आसन करताना आपल्या मेंदूला भरपूर आणि सुरळीत रक्तपुरवठा होतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. विद्यार्थ्यांनी या आसनाचा नक्कीच सराव करायला हवा. रागावर नियंत्रण कसे करावे? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास त्याला शशांकसान हेच उत्तर राहील. पुढे आपण शशांकासनापासून होणारे विविध फायदे तसेच त्याची कृती कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेऊयात. (Shashankasana information in marathi) सुरुवातीला आपल्या योग करण्याच्या आसनावर वज्रासनात (वज्रासनाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.) बसावे.  वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपले दोन्ही हात सरळ वर करा.  आता आपले शरीर हलके करून शरीराचा वरचा भाग हळू हळू समोर आणावा. समोर ...

कूर्मासन कृती आणि फायदे | Kurmasana steps and benefits

कूर्मासन  कूर्म हा संस्कृत शब्द असून या शब्दाचा अर्थ कासव असा होतो. " कूर्मासन " हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार कासवाप्रमाणे बनतो किंवा दिसतो म्हणून या आसनाला कुर्मासन असे म्हणतात. तसेच या आसनाला  इंग्रजी मध्ये " Tortoise Pose " असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे मानसिक तणाव कमी होतो व मनाची एकाग्रता साधल्या जाते. कुर्मासन कसे करावे म्हणजे कुर्मासनाची कृती आणि त्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे या बद्दल सविस्तर मराठी मध्ये माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Kurmasana steps and benefits in marathi) image source:  https://commons.wikimedia.org/wiki/File:K%C5%ABrm%C4%81sana_-_Tortoise_Pose_with_Hands_Facing_Back.jpg कृती:  आपल्या योगासने करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय पुढे सरळ लांब करून बसा.  आपल्याला शक्य होईल तेव्हडे जास्तीत जास्त अंतर आपल्या दोन्ही पायामधे ठेवण्याचा प्रयत्न करा.  दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला घट्ट चिटकवून राहूद्या.  आता कमरेतून हळू हळू  समोर वाका, कमरेतून समोर वाकल्यामुळे आपल्या पाठीला वाक येणार नाही....

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...