Skip to main content

Posts

तोलांगुलासन | Tolangulasana

तोलांगुलासन   या आसनस्तिथीत शरीराचा आकार तराजू सारखा दिसतो म्हणून या आसनाला  तोलांगुलासन(Tolangulasana) असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी खूपच सोपे आहे. हे आसन करत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर व नितंबावर पडतो त्यामुळे आपले खांदे, हात व पाठीचा मणका मजबूत बनतो. या आसनाच्या सरावामुळे कमरेवरची व पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनाची कृती व फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये बघुयात.  कृती: प्रथम आपल्या आसनावर पद्मासन घालून बसा. आता दोन्ही हाताचे पंजे निताम्बाखाली ठेऊन  झोपा. जर पंजे नितंबाखाली ठेऊन झोपणे अवघड जात असेल तर हातांच्या कोपराच्या साह्याने पद्मासनाची संपूर्ण बैठक उचलून भार कमरेवर आणा. आता मान व डोके जास्तीत जास्त पुढे उचलून धरा. मान व डोके पुढे उचलून धरल्यानंतर जितक्या वेळ श्वास रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरा, नंतर हळू हळू श्वास बाहेर सोडा, डोळे उघडे ठेवा. आता शरीर ताणलेल्या अवस्थेत ठेवा आणि श्वासोश्वास चालू राहू द्या. हि कृती करताना आपल्या शरीरांच्या स्नायूंवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ...

सेतुबंधासन व त्याचे फायदे | Bridge Pose & its Benefits

  'सेतू ' म्हणजे पूल. या आसनात शरीराचा आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास 'सेतुबंधासन,(setu bandhasana) असे म्हणतात.  हे एक उपयुक्त आसन असल्यामुळे सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी ते करण्याचा प्रयत्न करावा.  या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊन  फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व तसेच उच्च रक्तदाब, दमा, ऑस्टिओपोरोसिस, सायनस या सारखे आजार दूर करते. या आसनाचा सराव आपल्याला तणाव मुक्त करू शकते. जर तुमची नेहमीच चीड चीड होत असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ताण येत असेल तर या आसनाच्या सरावामुळे तुमचे मन शांत होऊन तुमचा ताण कमी होण्यास मदत होते. येथे आपण सेतुबंधासनाची कृती आणि फायद्याबद्दल(setu bandhasana in marathi) मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात.  https://www.flickr.com/photos/yogamama-co-uk/3794906358 कृती:(Setubandhasana Steps) जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. आता गुडघे वाकवून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचला. कंबरेला आकृतीत दाखवल्या प्रमाणे हातांचा आधार द्या. डोके, मान व  खांदे जमिनीवर टेकलेले असू द्या. सहजपणे श्व...

पवनमुक्तासन | Pavanmuktasana | - पोटाचे सर्व विकार दूर करते.

       पोट खुश तर आपण खुश. आपले जर पोट निरोगी असेल तर त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो, आपण कुठलेही काम उत्साहाने करतो. या आसनाच्या नियमित सरावाने पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो व त्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटामध्ये साचलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे भविष्यात उध्दभवणारे पोट फुगणे, बैचेन होणे, डोके दुखणे या सारख्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणूनच पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी एक सर्वोत्तम आसन म्हणजे पवनमुक्तासन(Pavanmuktasana) . पवन म्हणजे वायू या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात. महिलांसाठी सुद्धा हे आसन फार उपयुक्त आहे कारण या आसनाच्या सरावामुळे गर्भाशयाशी संबंधित असलेले आजार दूर होतात. चला तर पवनमुक्तासनाची माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.   कृती: प्रथम सरळ पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ लांब ठेवा. पायाचे पंजे एकमेकाना जुळवून ठेवा. आता एक खोल श्वास घ्या व तो रोखून धारा आता  उजवा गुडघा आकृतीत दाखवल्या प्रमान...

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सिद्धासन करा | Sidhasana - A Meditation Posture

सिद्धासन (Sidhasana - A Meditation Posture) या आसनाचे मुख्य कार्य सुषुप्त कुंडलिनी शक्ती जागृत करणे हे आहे. म्हणूनच या आसनाला ' सिद्धासन ' असे म्हणतात. सिद्धासनाच्या सरावामुळे आपले चित्त स्थिर होऊन स्मरणशक्ती वाढण्यासाठी भरपूर मदत होते, तसेच या आसनाचा नियमित सराव यौनरोग दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.  पद्मासना प्रमाणेच सिद्धासन हि सुद्धा एक ध्यानमुद्रा आहे. ( Sidhasana A Meditation Posture ) खाली आपण सिद्धासनाचे फायदेआणि कृतीबद्दल थोडक्यात जाणून घेउयात  जाणून घेऊयात. ( Sidhasana information  in marathi)  Photo by  Oluremi Adebayo  from  Pexels कृती: (Sidhasana Steps)  सुरुवातीला जमिनीवर बसा.   आता गुदद्वार आणि शिश्न यांच्या मध्यभागी उजव्या पायाची टाच रेटून लावा.  आता जननेंद्रियाच्या मूळ भागाच्या हाडावर डाव्या पायाची टाच लावा.  दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत आणून गुडघ्यावर ठेवा.   दोन्ही पायाचे गुडघे जमिनीला टेकायला हवे.   पाठ,मान व मस्तक सरळ एका रेषेत ताठ ठेवावे.   आता डोळे ...

संतुलित आहार म्हणजे काय?(Balanced Diet)

संतुलित आहार व त्याचे फायदे 

शीर्षासन | shirshasana | कृती व फायदे

'शीर्ष' म्हणजे 'मस्तक' किंवा 'डोके'. या आसनामध्ये सर्व शरीराचा भार केवळ आपल्या डोक्यावर तोलून धरावा लागतो, म्हणून या आसनास 'शीर्षासन' असे म्हणतात. शीर्षासनाला  सर्व आसनांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते.  या आसनाच्या नियमित सरावामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच स्वप्नदोषाचा त्रास नाहीसा होतो. या आसनाची कृती व त्यापासून मिळणारे फायदे( shirshasana benefits in marathi ) या बद्दल सर्व माहिती आपण या ठिकाणी मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.      pic credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Salamba_Sirsasana_-_Supported_Headstand.jpg कृती:   प्रथम आपले आसन जमिनीवर पसरवा. दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफून जमिनीवर ठेवा. आता बोटांची गुंफण व हाताच्या कोपरांमध्ये डोके टेकवा. बोटांची गुंफण डोक्याच्या मागील बाजूस येऊ द्या. नंतर पायांचे गुडघे हाताच्या कोपरापर्यंत सरकवून हळू हळू कंबर उचलून पायही छताकडे उंच करा. पाय छताकडे नेत असताना गुडघे मुडपून पाय हळूहळू वर न्या व नंतर पाय ताठ करा. पाय गुडघ्यातून न वाकवता सरळ छताकडे ताठ ठेवण्याचा प्रयत...

वृक्षासन- एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय | Vrikshasana

वृक्षासन      पायावर उभे राहून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन आहे, हे आसन करण्यास अत्यंत सोपे असून या आसनात शरीराचा आकार वृक्षाप्रमाणे म्हणजेच झाडाप्रमाणे दिसत असल्यामुळे या आसनाला वृक्षासन(Vrikshasana)  असे म्हणतात. या आसनालाच इंग्रजी मध्ये ट्री पोझ (tree pose) असे म्हणातात. या असणामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा भार एका पायावर तोलल्या जातो तसेच हे आसन करताना आपले संपूर्ण शरीर ताणले जाते व आपल्या हातापायांच्या साध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. स्ट्रेचिंग करण्यासाठी वृक्षासन हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. या आसनामुळे आपले हात, पाय, मांड्या व कंबर यांचा भरपूर व्यायाम होतो. हे आसन एकाग्रता वाढविण्यासाठी खूप मदतगार आहे. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो, असे करताना डोक्यातील इतर विचार आपोआपच बाजूला सारल्या जातात त्यामुळे मानसिक  स्थैर्य साधल्या जाते. याचाच उपयोग स्मरणशक्ती वाढण्या साठी होतो.  चला तर मग वृक्षासनाची कृती व त्यापासून मिळणारे संपूर्ण फायदे या बद्दल मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Vrikshasana steps and benefits inform...

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...