वर्तुळासन
हे आसन करताना शरीराचा आकार आकार वर्तुळासारखा गोल बनतो म्हणून या आसनाला वर्तुळासन (Vartulasana ) असे म्हणतात. वर्तुळासन हे हलासन प्रकारातीलच एक आसन आहे. ज्यांना हलासन चांगल्या प्रकारे करता येते त्यांना वर्तुळासन सहज करता येईल.
कृती:
![]() |
| Photo by Elina Fairytale: https://www.pexels.com/photo/woman-in-white-tank-top-and-leggings-doing-yoga-3822534/ |
- जमिनीवर सरळ पाठीवर झोपा.
- आपण ज्या प्रमाणे हालासनामध्ये दोन्ही पाय उचलून मागे नेतो त्याप्रमाणे पाय मागे न्या.
- आता उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा व डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा.
- हे आसन करताना शरीराला हिसका बसणार नाही याची काळजी घ्या.
- या आसन स्थितीत आठ ते दहा सेकंद राहिल्या नंतर पायाचे अंगठे सोडून द्या.
- आता हळूहळू पूर्वस्थितीत या.
- दोन्ही हात नितंबाजवळ सरळ ताठ ठेवा.
फायदे:
- या आसनाच्या नित्य सरावामुळे खांद्यातील सांध्यांना चांगला व्यायाम मिळतो.
- या आसनाच्या सरावामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
- या आसनाच्या सरावामुळे यौनग्रंथी सुदृढ बनतात.
- शरीरात चैतन्य निर्माण होते.
- या आसनाच्या सरावामुळे नपुंसकतेच्या दोष दूर होण्यास मदत होते.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏