Skip to main content

Posts

चतुरंग दंडासन | Chaturanga Dandasana information in Marathi

 चतुरंग दंडासन  "चतुरंग दंडासन" या आसनाच्या नावाची फोड केली तर आपल्याला या नावाचा अर्थ समजेल. चतुरंग = चतुर + अंग आणि दंडासन = दंड + आसन. चतुर म्हणजेच चार, अंग म्हणजे आपल्या शरीर, दंड म्हणजे मजबूत काठी आणि आसन म्हणजेच मुद्रा. हे आसन करताना आपल्या शरीराचे चार भाग एका मजबूत आणि सरळ काठी प्रमाणे बनतात म्हणून या आसनाला "चतुरंग दंडासन" असे म्हणातात. हे आसन सुरुवातीला करण्यासाठी थोडे अवघड असले तरी या आसनामुळे आपल्याला बरेच फायदे मिळतात. ज्या लोकांनी नवीनच योगासने करण्यासाठी सुरवात केली आहे त्यांच्या साठी हेआसन खूप फायदेशीर आहे कारण या आसनामुळे त्यांचे शरीर मजबूत आणि स्थिर बनेल तसेच पुढचे काही कठीण आसने करण्यास कार्यक्षम बनेल. हे आसन केल्यामुळे आपल्या शरीराला मजबुती मिळते तसेच आपले पोट सुटत नाही किंवा सुटलेले असल्यास ते कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये खाली बघणार आहोत. (Chaturanga Dandasana information in Marathi) pic credit:  https://ccnull.de/foto/yoga-low-plank/1008076 कृती: आपल्या योगा करण्याच्या आसनावर (Yoga Mat ) पोटाव...

कंदपीडासन - संधिवातासारखे विकार बरे होतात | Kandapidasana

कंदपीडासन /कंदपीडनासन  हे आसन करण्यासाठी खूप अवघड आहे, त्यामुळे हे आसन सर्वांनाच जमेल असे नाही. या आसनाच्या सरावामुळे संधिवातासारखे विकार बरे होतात. हे आसन करताना नाभीस्थानात जे मणिपूरचक्र असते, त्यावर दाब पडून त्याला त्रास होतो; म्हणून या आसनाला कंदपीडासन किंवा कंदपीडनासन असे म्हणतात. कंदपीडासनाची कृती व फायद्या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेऊयात. (Kandapidasana / Kandapidnasana information in marathi) कृती:  सर्वप्रथम आपल्या योगा करण्याच्या आसनावर(Yoga Mat) बसा.  आता आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पायांचे तळवे नाभीस्थानापर्यंत वर आणा.  आता आपले दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत जोडून छातीला चिटकून राहूद्या.  आपली मान, पाठ, आणि कंबर ताठ ठेवा.  नाक, हाताचे पंजे, पायाचे तळवे सरळ एका रेषेत ठेवा.  हे आसन करताना आपली श्वासोश्वासाची क्रिया नियमित आणि सावकाश चालू राहूद्या.  फायदे:  हे आसन पद्मासन आणि सिद्धासनाच्या कक्षेतील असल्यामुळे पद्मासन आणि सिद्धासनापासून मिळणारे सर्व फायदे या आसनाच्या सरावापासून सुद्धा मिळतात....

पश्चिमोत्तानासन कृती आणि फायदे | Benefits of Paschimottanasana

 पश्चिमोत्तानासन  जमिनीवर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन असून, हे आसन करण्यासाठी थोडे अवघड आहे. या आसनाला उग्रासन असे सुद्धा म्हणतात. पश्चिमोत्तासनच्या नियमित सरावामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधी असणाऱ्या तक्रारी या आसनाच्या सरावाने कमी होतात. तसेच मनाची चंचलता या आसनाच्या सरावाने कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल आपण संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Information and benefits of Paschimottanasana in marathi)  pic credit-  https://pixahive.com/photo/back-bend-yoga-paschimottanasana/ कृती: आपल्या योगा करण्याच्या आसनावर आपले पाय लांब पसरवून बसा.  आता कमरेमध्ये हळू हळू समोर वाकून आपल्या दोन्ही पायाचे अंगठे पकडा.  हि कृती करताना आपले दोन्ही पाय ताठ राहतील याची दक्षता घ्या.  सुरुवातीला अंगठे पकडता नाही आले तर आपल्या दोन्ही पायांचे घोटे पकडले तरी चालतील.  आता श्वास बाहेर सोडून आपले मस्तक आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा.  या स्थितीत आल्या नंतर आप...

अर्ध शलभासन - बद्धकोष्टता दूर करते | Ardha-Shalbhasana

अर्ध शलभासन येथून पुढे आपण पोट जमिनीला टेकवून करायची आसने बघुयात. शलभासनाचे दोन प्रकार आहेत. हे आसन एका पायाने करण्यात येते म्हणून या आसनास 'अर्ध शलभासन'(ardha shalbhasana) असे म्हणतात. या आसनाच्या नित्य सरावामुळे बद्धकोष्टता, वातविकार, अपचन, जुलाब होणे असे विकार दूर होतात.  भुजंगासनामुळे   शरीराच्या वरील भागास फायदा होतो तर शलभासनामुळे शरीराच्या कमरे खालील अवयव मजबूत बनतात. अर्ध शलभासनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती खाली आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध आहे. (Ardha-Shalbhasana Benefits and information in Marathi)  कृती:  प्रथम जमिनीवर पालथे झोपा. हनुवटी जमिनीवर टेकवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना लागून शरीराला सामन्तर ठेवा.  दोन्ही हातांच्या मुठी वळलेल्या स्तिथीत ठेवा किंवा दोन्ही हात मांड्या खाली ठेवले तरी चालतील. आता श्वास आत खेचा, संपूर्ण शरीर एकदम ताठ करा आणि एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय हळू हळू वर उचला, पाय जितका वर नेता  येईल तितका वर न्या. पाय वरती नेत असताना तो गुडघ्यामध्ये वाकणार नाही याची काळजी घ्या.  ...

पादांगुष्ठासन – कृती, फायदे आणि खबरदारी | Padangushtasana in Marathi

पादांगुष्ठासन (Padangushtasana) – कृती, फायदे आणि खबरदारी योगासनांच्या नियमित सरावामध्ये शरीराचा तोल, एकाग्रता आणि संयम यांना विशेष महत्त्व आहे. पादांगुष्ठासन हे असेच एक संतुलन साधणारे योगासन आहे. या आसनामध्ये शरीराचा संपूर्ण भार पायाच्या चवड्यावर म्हणजेच पायांच्या बोटांच्या भागावर सांभाळावा लागतो. पादांगुष्ठासनाचा सराव करताना सुरुवातीला शरीराचा तोल सांभाळणे थोडे कठीण जाऊ शकते. विशेषतः ज्यांचे वजन जास्त आहे किंवा ज्यांना शरीराचा समतोल राखण्याची सवय नाही, त्यांना हे आसन करताना अडचण येऊ शकते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि नियमित सरावामुळे हळूहळू शरीराची स्थिरता सुधारण्यास मदत होते. योगशास्त्रातील पारंपरिक मान्यतेनुसार हे आसन ब्रह्मचर्याच्या पालनासाठी उपयुक्त मानले जाते. आता आपण पादांगुष्ठासन करण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे आणि आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. पादांगुष्ठासन करण्याची कृती (Padangushtasana Steps) १. सर्वप्रथम सपाट आणि स्वच्छ जागेवर योगमॅट अंथरून सरळ उभे राहा. २. आता डाव्या पायाचा चवडा म्हणजेच पायांच्या बोटांचा भाग जमिनीवर ठेवून डावा पाय गुडघ्यात वाकव...

नियमित योगासने करण्याचे काही चमत्कारिक फायदे | Benefits of Yoga in Marathi

योगासने का करावीत ?      नियमित  योग अभ्यासाचे  आपल्याला होणारे फायदे जाणून घेण्याआधी आपण नियमित योगाभ्यास किंवा योगासने का करावी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजच्या या विज्ञान युगात आपली जीवनशैली फार बदललेली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण खूप आळशी बनत चाललो आहोत. वेळ वाचविण्यासाठी आपण घरापासून थोडे अंतरावर जाण्यासाठी सुद्धा गाडी वापरतो. घरातून खाली उतरण्यासाठी लिफ्ट चा वापर करतो. या मुळे शरीरातील स्थूलपणा वाढत चालला आहे. चैनीच्या वस्तूंचा वापर करण्यासाठी इथे विरोध करत नाही परंतु त्याच चैनीच्या वस्तू जर आपल्या शरीरासाठी धोकादायक बनत असतील तर त्यांचा उपयोग कमी करायला हवा. आपली शारीरिक हालचाल खूप कमी होत चालली आहे तसेच या स्पर्धेच्या युगात घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावण्याच्या सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत आहे त्यामुळे शुगर, बीपी, पोट साफ न होणे, एसिडिटी, मानसिक रोग, नैराश्य या सारखे आजार होण्याचा धोका वाढत चालला आहे.       शरीराला व्यायाम मिळण्यासाठी प्रत्येकालाच जिम लावणे परवडण्यासारखे नाह...

मंडूकासन: कृती, फायदे आणि घ्यायची काळजी | Mandukasana

मंडूकासन (Mandukasana) – कृती, फायदे आणि घ्यायची काळजी | Frog Pose in Marathi योगासनांचा नियमित सराव केल्यामुळे शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत होते. काही योगासने शरीराच्या लवचिकतेवर भर देतात, तर काही आसनांमुळे पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. मंडूकासन हे पोटाच्या भागावर सौम्य दाब निर्माण करणारे एक पारंपरिक योगासन आहे. 'मंडूक' हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'बेडूक' असा होतो. हे आसन करताना शरीराची स्थिती बेडकासारखी दिसते, म्हणून या आसनाला मंडूकासन असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Frog Pose असे संबोधले जाते. मंडूकासन करताना वज्रासनात बसून दोन्ही हातांच्या मुठी पोटाजवळ ठेवाव्या लागतात आणि श्वास सोडत शरीर हळूहळू पुढच्या बाजूला झुकवावे लागते. या स्थितीत पोटाच्या भागावर हलका दाब निर्माण होतो. त्यामुळे पोटाच्या स्नायूंना आणि शरीराच्या मध्यभागाला विशिष्ट प्रकारचा ताण जाणवतो. चला तर मग, मंडूकासन कसे करावे, त्याचे फायदे कोणते आहेत आणि हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मंडूकासन करण्याची कृती (Mandukasana Steps) मंडूकासन ...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...