मंडूकासन
मंडूक हा एक संस्कृत शब्द असून याचा अर्थ बेडूक असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडका प्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला 'मंडूकासन' असे म्हणतात. या आसनाला इंग्रजी मध्ये फ्रॉग पोझ (Frog Pose) म्हणतात. हे आसन आपल्या पोटच्या आतील अवयवांसाठी तसेच पोटाच्या भवती वाढलेली चरबी कमी कारण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो. येथे आपण मंडूकासानाची कृती, त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती जाणून घेउयात. (Mandukasana information in Marathi)
![]() |
| मंडूकासन |
कृती:
- सर्वप्रथम आपल्या आसनावर(Yoga Mat) वरती वज्रासनाच्या स्थितीत बसा. या स्थितीत बसल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या मांड्यावर ठेवा.
- आता आपल्या दोन्ही हातांची बोटे मुठी वाळल्याप्रमाणे आत घ्या परंतु आपले अंगठे बाहेर राहूद्या.
- आता दोन्ही आवळलेल्या मुठी एकमेकांना लावून बेंबीच्या खालच्या बाजूस पोटाला चिटकवून ठेवा.
- आता एक दीर्घ श्वास, घ्या त्यानंतर हळू हळू श्वास सोडत हळू हळू समोरच्या बाजूला झुका.
- समोर झुकल्या नंतर तुमच्या बेंबीजवळच्या भागावर थोडा ताण पडेल, आणि छाती आपल्या मांड्याना लागलेली असेल.
- या स्थितीत आपली मान सरळ असेल व आपले खांदे झुकलेल्या स्थितीत राहूद्या.
- एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा.
- याच झुकलेल्या स्थितीत सामान्य पाच ते सहा श्वास घ्या.
- आता वर येताना हळू हळू श्वास आत घेत वर या.
फायदे:
- पोट कमी करण्यासाठी हे आसन फार उपयुक्त आहे. या आसनाच्या सरावामुळे पोटभावती वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
- तसेच या आसनाच्या सरावाने हृदयाची कार्यक्षमता सुद्धा सुधारते.
- या आसनाच्या सरावामुळे पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो.
- पचनशक्ती सुधारण्यासाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे.
- या आसनाच्या सरावाने पोटात वायू (गॅस) निर्माण होणे, अपचन, बद्धकोष्टता, भूक न लागणे या सारखे अनेक विकार दूर होतात.
- मुधुमेहाच्या रुग्णांकरिता अत्यंत उपयोगी असे हे आसन आहे.
टीप: पाठीचे दुखणे किंवा पोटाचे आजार असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. तसेच मायग्रेन, उच्च रक्तदाब असलेल्या रोग्यांनी सुद्धा हे आसन करू नये.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏