Skip to main content

नियमित योगासने करण्याचे काही चमत्कारिक फायदे | Benefits of Yoga in Marathi

योगासने का करावीत ?

    नियमित योग अभ्यासाचे आपल्याला होणारे फायदे जाणून घेण्याआधी आपण नियमित योगाभ्यास किंवा योगासने का करावी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजच्या या विज्ञान युगात आपली जीवनशैली फार बदललेली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण खूप आळशी बनत चाललो आहोत. वेळ वाचविण्यासाठी आपण घरापासून थोडे अंतरावर जाण्यासाठी सुद्धा गाडी वापरतो. घरातून खाली उतरण्यासाठी लिफ्ट चा वापर करतो. या मुळे शरीरातील स्थूलपणा वाढत चालला आहे. चैनीच्या वस्तूंचा वापर करण्यासाठी इथे विरोध करत नाही परंतु त्याच चैनीच्या वस्तू जर आपल्या शरीरासाठी धोकादायक बनत असतील तर त्यांचा उपयोग कमी करायला हवा. आपली शारीरिक हालचाल खूप कमी होत चालली आहे तसेच या स्पर्धेच्या युगात घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावण्याच्या सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत आहे त्यामुळे शुगर, बीपी, पोट साफ न होणे, एसिडिटी, मानसिक रोग, नैराश्य या सारखे आजार होण्याचा धोका वाढत चालला आहे. 

yoga

    शरीराला व्यायाम मिळण्यासाठी प्रत्येकालाच जिम लावणे परवडण्यासारखे नाही आणि बऱ्याच जणांकडे एव्हडा वेळ सुद्धा नाही. परंतु योग अभ्यास करायचा ठरवल्यास त्यासाठी जास्त वेळ आणि जागा लागत नाही. योग अभ्यास करण्यासाठी रोजचा अर्धा ते एक तास सुद्धा पुरेसा आहे. शिवाय कमी वेळेत आणि शरीराला जास्त कष्ट न पोहचविता आपण आपल्या शरीराला निरोगी, स्वस्थ आणि सुडोल बनवू शकतो. योग अभ्यासाच्या नियमित सरावामुळे आपण आपल्या शरीराला जडलेले वेगवेगळ्या प्रकारचे विकार, व्याधी किंवा आजार दूर करू शकतो किंवा ते आपल्याला होण्यापासून वाचवू शकतो. मनुष्याच्या शारीरिक दुखण्यावर आणि मानसिक यातनांवर उपाय फक्त योगा जवळच आहे. खाली आपण नियमित योगासने करण्याचे काही चमत्कारिक फायदे बद्दल थोडक्यात माहिती बघुयात. (Benefits and information of Yoga in Marathi)

योगाभ्यासाचे फायदे !

उत्साह निर्माण होतो

योगासनांच्या नियमित सरावामुळे शरीराचे आंतरिक भाग व अवयव कार्यक्षम बनतात. तसेच शरीरात एक जोम नवीन उत्साह निर्माण होतो त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन सुधारतो. व्यायामाच्या इतर पद्धतीपेक्षा योगासनांचा प्रभाव मानवी मनावर व इतर इंद्रियांवर अधिक होतो त्यामुळे मन आणि इतर इंद्रिये काबूत ठेवण्याची शक्ती एक कला आपल्याला अवगत होते. 

 शरीराला लवचिकता प्राप्त होते

नियमित योगासनांच्या सरावामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते त्याचाच परिणाम म्हणून शरीरात एक नवीन उत्साह निर्माण होतो. 

मानसिक शांती मिळते 

नियमित योगाभ्यास आपल्याला मानसिक शांती प्राप्त करून देतो त्यामुळे आपल्याला परमसुखाची अनुभूती येते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

योग अभ्यासाचा सरावामुळे शरीरातील मल आणि इतर घाण शरीराच्या बाहेर टाकल्या जाते त्याचाच परिणाम म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते

योगासनांच्या नियमित सरावामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते त्याचाच परिणाम म्हणून शरीरातील प्रत्येक अवयवांना पुरेश्या प्रमाणात रक्त पुरवठा होतो.  

स्वस्थ व निरोगी जीवन जगण्याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. 

योगासनांच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्टता मधुमेह, बीपी, डोकेदुखी, हर्निया, लैंगिक आजार, मानसिक आजार वैगेरे रोग बरे होतात. योगासनांच्या सरावामुळे स्वस्थ व निरोगी जीवन जगण्याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...