Skip to main content

Posts

पश्चिमोत्तानासन कृती आणि फायदे | Benefits of Paschimottanasana

 पश्चिमोत्तानासन  जमिनीवर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन असून, हे आसन करण्यासाठी थोडे अवघड आहे. या आसनाला उग्रासन असे सुद्धा म्हणतात. पश्चिमोत्तासनच्या नियमित सरावामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधी असणाऱ्या तक्रारी या आसनाच्या सरावाने कमी होतात. तसेच मनाची चंचलता या आसनाच्या सरावाने कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल आपण संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Information and benefits of Paschimottanasana in marathi)  pic credit-  https://pixahive.com/photo/back-bend-yoga-paschimottanasana/ कृती: आपल्या योगा करण्याच्या आसनावर आपले पाय लांब पसरवून बसा.  आता कमरेमध्ये हळू हळू समोर वाकून आपल्या दोन्ही पायाचे अंगठे पकडा.  हि कृती करताना आपले दोन्ही पाय ताठ राहतील याची दक्षता घ्या.  सुरुवातीला अंगठे पकडता नाही आले तर आपल्या दोन्ही पायांचे घोटे पकडले तरी चालतील.  आता श्वास बाहेर सोडून आपले मस्तक आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा.  या स्थितीत आल्या नंतर आप...

अर्ध शलभासन - बद्धकोष्टता दूर करते | Ardha-Shalbhasana

अर्ध शलभासन येथून पुढे आपण पोट जमिनीला टेकवून करायची आसने बघुयात. शलभासनाचे दोन प्रकार आहेत. हे आसन एका पायाने करण्यात येते म्हणून या आसनास 'अर्ध शलभासन'(ardha shalbhasana) असे म्हणतात. या आसनाच्या नित्य सरावामुळे बद्धकोष्टता, वातविकार, अपचन, जुलाब होणे असे विकार दूर होतात.  भुजंगासनामुळे   शरीराच्या वरील भागास फायदा होतो तर शलभासनामुळे शरीराच्या कमरे खालील अवयव मजबूत बनतात. अर्ध शलभासनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती खाली आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध आहे. (Ardha-Shalbhasana Benefits and information in Marathi)  कृती:  प्रथम जमिनीवर पालथे झोपा. हनुवटी जमिनीवर टेकवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना लागून शरीराला सामन्तर ठेवा.  दोन्ही हातांच्या मुठी वळलेल्या स्तिथीत ठेवा किंवा दोन्ही हात मांड्या खाली ठेवले तरी चालतील. आता श्वास आत खेचा, संपूर्ण शरीर एकदम ताठ करा आणि एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय हळू हळू वर उचला, पाय जितका वर नेता  येईल तितका वर न्या. पाय वरती नेत असताना तो गुडघ्यामध्ये वाकणार नाही याची काळजी घ्या.  ...

पादांगुष्ठासन मराठी माहिती | Padangushtasana information in marathi

 पादांगुष्ठासन ब्रह्मचार्याच्या पालनासाठी या आसनाचा फार उपयोग होतो. पादांगुष्ठासनाच्या नियमित सरावामुळे वीर्य मेंदूकडे जाते म्हणजे त्याची ऊर्ध्व गती होते आणि त्यामुळे त्याचे ओजसशक्ती मध्ये रूपांतर होते. हे आसन जाड लोकांना म्हणजेच ज्यांचे वजन जास्त आहे जे लोक स्थूल आहेत त्यांना करण्यासाठी थोडे अवघड जाते परंतु नियमित सराव केल्यास हे आसन सहज करता येईल. सुरुवातीला हे आसन करताना मागे पुढे किंवा उजव्या बाजूला तोल जाऊन पडण्याची दाट शक्यता असते परंतु नियमित सरावानंतर स्थिरता साधता येते. आता आपण पुढे  पादांगुष्ठासनाची कृती व फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेऊयात.(Padangushtasana information in marathi)  कृती: प्रथम आपल्या डाव्या पायाचा चवडा म्हणजे पायांच्या बोटांचा भाग जमिनीवर उभा ठेवा, आपल्या डाव्या पायाची टाच आपल्या गुदद्वार आणि वृषण यांच्यामध्ये ठेवा.  आता आपल्या शरीराचे वजन आपल्या डाव्या पायाच्या चवड्यावर म्हणजेच डाव्या पायाच्या बोटांच्या भागावर तोलून धरा. आपला उजवा पाय हा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा.  असे करताना जमिनीचा किंवा भिंतीचा आधा...

नियमित योगासने करण्याचे काही चमत्कारिक फायदे | Benefits of Yoga in Marathi

योगासने का करावीत ?      नियमित  योग अभ्यासाचे  आपल्याला होणारे फायदे जाणून घेण्याआधी आपण नियमित योगाभ्यास किंवा योगासने का करावी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजच्या या विज्ञान युगात आपली जीवनशैली फार बदललेली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण खूप आळशी बनत चाललो आहोत. वेळ वाचविण्यासाठी आपण घरापासून थोडे अंतरावर जाण्यासाठी सुद्धा गाडी वापरतो. घरातून खाली उतरण्यासाठी लिफ्ट चा वापर करतो. या मुळे शरीरातील स्थूलपणा वाढत चालला आहे. चैनीच्या वस्तूंचा वापर करण्यासाठी इथे विरोध करत नाही परंतु त्याच चैनीच्या वस्तू जर आपल्या शरीरासाठी धोकादायक बनत असतील तर त्यांचा उपयोग कमी करायला हवा. आपली शारीरिक हालचाल खूप कमी होत चालली आहे तसेच या स्पर्धेच्या युगात घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावण्याच्या सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत आहे त्यामुळे शुगर, बीपी, पोट साफ न होणे, एसिडिटी, मानसिक रोग, नैराश्य या सारखे आजार होण्याचा धोका वाढत चालला आहे.       शरीराला व्यायाम मिळण्यासाठी प्रत्येकालाच जिम लावणे परवडण्यासारखे नाह...

मंडूकासन कृती मराठी माहिती | Mandukasana

मंडूकासन       मंडूक हा एक संस्कृत शब्द असून याचा अर्थ बेडूक असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडका प्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला ' मंडूकासन'  असे म्हणतात. या आसनाला इंग्रजी मध्ये फ्रॉग पोझ (Frog Pose) म्हणतात. हे आसन आपल्या पोटच्या आतील अवयवांसाठी तसेच पोटाच्या भवती वाढलेली चरबी कमी कारण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो. येथे आपण मंडूकासानाची कृती, त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती जाणून घेउयात. (Mandukasana information in Marathi) मंडूकासन  कृती: सर्वप्रथम आपल्या आसनावर(Yoga Mat) वरती वज्रासनाच्या स्थितीत बसा. या स्थितीत बसल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या मांड्यावर ठेवा.  आता आपल्या दोन्ही हातांची बोटे मुठी वाळल्याप्रमाणे आत घ्या परंतु आपले अंगठे बाहेर राहूद्या.  आता दोन्ही आवळलेल्या मुठी एकमेकांना लावून बेंबीच्या खालच्या बाजूस पोटाला चिटकवून ठेवा.  आता एक दीर्घ श्वास, घ्या त्यानंतर हळू हळू श्वास सोडत हळू हळू समोरच्या बाज...

Kukkutasana Benefits | कुक्कुटासन करण्याचे फायदे

कुक्कुटासन कुक्कुट हा एक संस्कृत शब्द असून त्या शब्दाचा अर्थ कोंबडा असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार दोन पायावर उभ्या असलेल्या कोंबड्यासारखा दिसतो म्हणून या आसनाला कुक्कुटासन असे म्हणतात. या आसनालाच इंग्रजी मध्ये Cockerel Pose असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे आपल्या दोन्ही हातांच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते , तसेच मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना होणारे विविध त्रास सुद्धा या आसनाच्या नियमित सरावामुळे कमी होतात . चला तर मग कुक्कुटासन कसे करायचे आणि त्यापासून मिळणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात. ( Kukkutasana steps and benefits information in marathi) Image source:  https://pixahive.com/photo/kukkutasana-cockerel-pose/              कृती: सर्वप्रथम आपल्या आसनावर(yoga mat) पद्मासनात बसा.  आता आपले दोन्ही हात आपल्या मांडी आणि पोटऱ्यांच्या मध्ये घालावेत आणि आपले हाताचे तळवे जमिनीवर टेकवावे. ...

भद्रासन मराठी माहिती | Bhadrasana information in marathi

भद्रासन (Bhadrasana) भद्रासनालाच बद्धकोनासन असे सुद्धा म्हणतात. भद्रासनाच्या सरावामुळे पायाच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आपल्या पायांची आणि मांड्यांची लवचिकता वाढते. तसेच कंबरदुखी, डोकेदुखी, उलटी, दमा या सारख्या अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या चंचल मनावर ताबा मिळवण्यासाठी हे आसन फार उपयुक्त असून या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच या आसनाच्या नियमित  सरावामुळे मनःशांती मिळते. भद्रासनच्या सरावामुळे मुलचक्र कार्यान्वित होते. हे आसन करण्यासाठी अत्यंत सोपे आणि आरामदायी असल्यामुळे आपण या आसनाचा सराव भरपूर वेळेपर्यंत करू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये भद्रासन हे ध्यानधारणे साठी उत्तम असे आसन आहे असे सांगितले आहे. खाली आपण भद्रासनाची कृती आणि फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती बघुयात.(Bhadrasana information in marathi)  pic credit:  https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/64/Baddha_konasana.jpg कृती: सर्वप्रथम जमिनीवर पांघरलेल्या आसनावर पाय सरळ लांबवून बसावे.  आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पा...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...