Skip to main content

Posts

बकासन - आत्मविश्वास वाढण्यास मदत होते | Bakasana

बकासन   हे आसन करण्यासाठी थोडे अवघड असले तरी रोजच्या नियमित सरावाने या आसनाची सहज साधना करता येईल. बकसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला सर्वांगीण फायदे मिळतात. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्याला आपल्या दोन्ही हातावर तोलून धरावा लागतो त्यामुळे हे आसन शांत चित्ताने करावे जेणेकरून आपण आपला तोल जाऊन पडणार नाही. या आसनाच्या सरावामुळे छातीचे व पोटाचे स्नायू मजबूत बनतात तसेच आपले मन स्थिर होऊन आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. खाली आपण बकसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Bakasana information in marathi)  image क्रेडिट-  https://pixahive.com/photo/crow-pose-bakasana/ कृती:  आपल्या दोन्ही हातांचे पंजे आपल्या खांद्याला समांतर असे आसनावर ठेवा.  आता आपल्या दोन्ही हातांच्या दंडावर आपल्या दोन्ही पायांचे गुडघे टेकवा.  आता आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपल्या संपूर्ण शरीर आपल्या दोन्ही हातावर तोलण्याचा प्रयत्न करा.  हि कृती करताना आपले हात कोपऱ्यातून वाकणार नाहीत याची काळजी घ्या.  तसेच आपली मान थो...

मयूरासन - कृती व फायदे | Mayurasana

मयूर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मोर असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार पिसारा न फुलवता दोन पायावर उभ्या असलेल्या मोरा सारखा भासतो म्हणून या आसनाला मयूरासन असे म्हणतात.  या आसनाच्या सरावामुळे पचनशक्ती चे कार्य सुधारते तसेच शरीरात एक नवीन उत्साह, जोम निर्माण होतो. आपल्या संपूर्ण शरीराचे वजन आपल्या दोन्ही हातावर तोलून धरल्या जात असल्यामुळे या आसनाची क्रिया करण्यासाठी थोडी अवघड आहे परंतु चिकाटीने प्रयत्न केल्यास आपण हे आसन नक्की करू शकू. येथे आपण मयूरासनाची कृती व फायद्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.  Image credit :  https://commons.wikimedia.org/wiki/File:Mayurasana...jpg कृती:  प्रथम आपल्या आसनावर गुडघ्यांवर बसा दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर असू द्या.  आता समोरच्या बाजूला झुकून दोन्ही तळ हात जमिनीवर टेकवा. आपल्या हातांची बोटे हि आपल्या गुडघ्यांच्या दिशेने असतील या पद्धतीने हात जमिनीवर टेकवा. आपल्या दोन्ही हातांच्या करंगळ्या जवळजवळ असतील व दोन्ही अंगठे जमिनीला टेकलेले असतील याची काळजी घ्या.  आता दोन्ही हातांचे कोपर नाभीच्या थोडे खाली पोटाला चिटकवा...

आयुर्वेदिक वनऔषधी- गुळवेलाचे फायदे | Gulvel

गुळवेल या कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवणे आणि ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. मागील काही ब्लॉग मध्ये आपण पद्मासन , सिद्धासन , सर्वांगासन या सारखी अनेक अशी योगासने बघितली कि ज्यामुळे आपल्या अंतर आणि बाह्य शरीराला भरपूर व्यायाम मिळून आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते. आता आपण अश्या एका वनऔषधी बद्दल माहिती जाणून घेऊयात कि ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास आणि ती बळकट होण्यास मदत होईल. गुळवेल, गुळवेल ला आयुर्वेदामध्ये अमृतवेल सुद्धा म्हणतात. गुळवेलाच्या सेवनामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत होते. सर्दी, ताप खोकला यासारख्या आजारांशी लढण्याची ताकत आपल्याला मिळते. गुळवेल मध्ये असलेल्या इम्युनोमॉडेलरी गुणधर्मामुळे आपली कमकुवत झालेली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. गुळवेलीमध्ये फॉस्परस, कॅलशियम, प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम असे अनेक शरीर उपयोगी औषधीय घटक आहेत. या वनौषधीच्या सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते त्यामुळे मधुमेह या सारखे आजार होण्याचा धोका टळतो. येथे आपण गुळवेल कसा ओळखावा, गुळवेलचा काढा कसा बनवावा आणि त्याचे फायदे या बद्...

कटि चक्रासन | Kati-chakrasana | कमरेवरील चरबी कमी होते.

कटि चक्रासन कटी चक्रासन(kati-chakrasana) हे आसन करण्यासाठी अगदी सहज आणि सोपे आहे. या आसनाची शब्द फोड करायची झाल्यास कटी म्हणजे कंबर आणि चक्रासन म्हणजेच चाकाप्रमाणे गोल फिरवणे. या आसनाच्या नित्य सरावामुळे कमरेवरील चरबी कमी होते तसेच पाठीचा मणका,  पोट, मानेसंबंधी असलेल्या तक्रारी दूर होतात. बैठे काम करणाऱ्यांसाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे. मागे आपण जमिनीवर झोपून करण्यात येणाऱ्या  कटी आसना  बद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण कटी चक्रासनाची कृती व फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात. हे आसन दोन्ही पायावर उभे राहून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील एक आसन आहे.  कृती: आपल्या आसनावर उभे राहा. दोन्ही पायात कमीत कमी एक फूट एवढे अंतर असू द्या.  आपले शरीर संपूर्ण सैल सोडा.  ज्या प्रमाणे आपण कवायत करताना दोनी हात समोर आणतो तसे दोन्ही हात सरळ समोर आना.  समोर आणलेल्या हातांचे तळवे एकमेकांकडे केलेले असावे. समोर आणलेले दोन्ही हात हे खांद्यांना समांतर असतील अशी काळजी घ्या.  दोन्ही हात छातीसमोर उचलताना खोल श्वास घ्या, आता हळू हळू उजवीकडे वळा....

कटीआसन | Katiaasan informaton in Marathi

कटीआसन कटी म्हणजेच कंबर, या आसनाच्या सरावामुळे कमरेला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आसनाचे नाव कटिआसन (Katiaasana) असे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे कमरेचे सर्व विकार दूर होतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे आसन खूप मदतगार आहे. हे आसन करण्यास थोडे अवघड आहे परंतु जर आपण नियमित सराव केला तर आपण हे आसन सहज करू शकू.( Katiaasan informaton in Marathi) कृती:  आपल्या आसनावर पाठीवर झोपा. शरीर पूर्ण सैल सोडा.  आता दोन्ही पाय हळूहळू वर घ्या.   पाय वर घेतल्यानंतर डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा व उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा.   दोन्ही पाय ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा.  कंबर व डोके जमिनीला टेकलेले राहू द्या व श्वास आत खेचा.  सुरुवातीला हे आसन आपण १० सेकंदापर्यंत करू शकतो.  सुरुवातीला हे आसन दररोज चार वेळा करावे.  फायदे: या आसनाच्या नियमित सरावामुळे खांदे व फुफ्फुसे मजबूत बनतात.  या आसनाच्या सरावामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे हृदयरोगास प्रतिबंध घालता येतो.  कमरेचे  सर्वप...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

वर्तुळासन (Vartulasana): कृती, फायदे, सावधगिरी आणि योगातील महत्त्व

वर्तुळासन  वर्तुळासन (Vartulasana) हे हलासनाच्या प्रकारातील एक प्रभावी योगासन आहे. या आसनामध्ये शरीराचा आकार वर्तुळासारखा दिसतो, म्हणून याला वर्तुळासन असे म्हणतात. हे आसन शरीराची लवचिकता वाढविण्यास, खांदे व पाठीच्या स्नायूंना सक्रिय करण्यास आणि संतुलन सुधारण्यास मदत करते. जर तुम्हाला हलासन (Halasana) योग्य प्रकारे करता येत असेल, तर वर्तुळासन शिकणे तुलनेने सोपे जाऊ शकते. वर्तुळासन म्हणजे काय? वर्तुळासन हे पाठीवर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये पाय डोक्याच्या मागे नेत दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडले जातात. शरीराची लवचिकता, संतुलन आणि स्नायूंचे नियंत्रण यासाठी हे आसन उपयुक्त मानले जाते. वर्तुळासन करण्यापूर्वी कोणती आसने करावीत? वर्तुळासन करण्यापूर्वी शरीराची तयारी करण्यासाठी खालील आसने करू शकता. पवनमुक्तासन भुजंगासन पश्चिमोत्तानासन हलासन सर्वांगासन यामुळे शरीर अधिक लवचिक होण्यास मदत होते. वर्तुळासन करण्याची कृती जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. हळूहळू दोन्ही पाय वर उचलून हलासनाच्या स्थितीत मागे न्या. आता उजव्या हाताने उजव्या पाय...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...