Skip to main content

मयूरासन - कृती व फायदे | Mayurasana

मयूर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मोर असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार पिसारा न फुलवता दोन पायावर उभ्या असलेल्या मोरा सारखा भासतो म्हणून या आसनाला मयूरासन असे म्हणतात.  या आसनाच्या सरावामुळे पचनशक्ती चे कार्य सुधारते तसेच शरीरात एक नवीन उत्साह, जोम निर्माण होतो. आपल्या संपूर्ण शरीराचे वजन आपल्या दोन्ही हातावर तोलून धरल्या जात असल्यामुळे या आसनाची क्रिया करण्यासाठी थोडी अवघड आहे परंतु चिकाटीने प्रयत्न केल्यास आपण हे आसन नक्की करू शकू. येथे आपण मयूरासनाची कृती व फायद्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 

mayurasana
Image credit : https://commons.wikimedia.org/wiki/File:Mayurasana...jpg

कृती: 

  • प्रथम आपल्या आसनावर गुडघ्यांवर बसा दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर असू द्या. 
  • आता समोरच्या बाजूला झुकून दोन्ही तळ हात जमिनीवर टेकवा. आपल्या हातांची बोटे हि आपल्या गुडघ्यांच्या दिशेने असतील या पद्धतीने हात जमिनीवर टेकवा. आपल्या दोन्ही हातांच्या करंगळ्या जवळजवळ असतील व दोन्ही अंगठे जमिनीला टेकलेले असतील याची काळजी घ्या. 
  • आता दोन्ही हातांचे कोपर नाभीच्या थोडे खाली पोटाला चिटकवा आणि ओणवे होऊन शरीराचा भार पुढे टाका त्यामुळे अलगदच मागचा भाग उचलण्यास मदत होईल. 
  • आता हळू हळू पाय सरळ लांब रेषेत ताठ ठेऊन जमिनीला समांतर राहतील असे वर उचला. 
  • शरीराला वर हवेत उचलताना श्वास रोखून धरा. 
  • पाच ते वीस सेकंदापर्यंत या आसन अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करा. 
  • येथे मयूरासनाची कृती पूर्ण होते. या अवस्थेत डोके, पाठ, नितम्ब आणि पाय हे जमिनीला सरळ रेषेत राहतात.
  • हि कृती झाल्यावर श्वास बाहेर सोडा. 
 

फायदे:   

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. 
  2. आपली त्वचा तजेलदार व चमकदार बनते. 
  3. शरीरात एक उत्साह निर्माण होतो. 
  4. या आसनाच्या सरावामुळे इंटरऍबडॉमिनल वर दाब वाढतो त्यामुळे फुफ्फुस आणि पोटाच्या अवयवात एका नवा जोम निर्माण होतो. 
  5. या आसनाच्या सरावामुळे हाताचे स्नायू मजबूत बनतात. 
  6. या आसनाच्या सरावामुळे पचनशक्ती सुधारते. 
  7. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. 
  8. मूळव्याध मुळे होणारा रक्तस्त्राव या आसनाच्या सरावामुळे बंद होतो. 
  9. या आसनाच्या नियमित सरावामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. 


टीप : हे आसन करताना शरीराला हिसका बसणार नाही याची विशेष काळजी घ्या. पोटदुखी, हर्निया, उच्चरक्तदाब असे त्रास असल्यास हे आसन करू नये. स्त्रियांनी हे आसन करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा  कारण हे आसन करताना गर्भाशय व अंडकोष या ठिकाणी भरपूर दाब पडू शकतो. 








Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...