बकासन हे आसन करण्यासाठी थोडे अवघड असले तरी रोजच्या नियमित सरावाने या आसनाची सहज साधना करता येईल. बकसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला सर्वांगीण फायदे मिळतात. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्याला आपल्या दोन्ही हातावर तोलून धरावा लागतो त्यामुळे हे आसन शांत चित्ताने करावे जेणेकरून आपण आपला तोल जाऊन पडणार नाही. या आसनाच्या सरावामुळे छातीचे व पोटाचे स्नायू मजबूत बनतात तसेच आपले मन स्थिर होऊन आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. खाली आपण बकसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Bakasana information in marathi) image क्रेडिट- https://pixahive.com/photo/crow-pose-bakasana/ कृती: आपल्या दोन्ही हातांचे पंजे आपल्या खांद्याला समांतर असे आसनावर ठेवा. आता आपल्या दोन्ही हातांच्या दंडावर आपल्या दोन्ही पायांचे गुडघे टेकवा. आता आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपल्या संपूर्ण शरीर आपल्या दोन्ही हातावर तोलण्याचा प्रयत्न करा. हि कृती करताना आपले हात कोपऱ्यातून वाकणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच आपली मान थो...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...