Skip to main content

Posts

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

वर्तुळासन (Vartulasana): कृती, फायदे, सावधगिरी आणि योगातील महत्त्व

वर्तुळासन  वर्तुळासन (Vartulasana) हे हलासनाच्या प्रकारातील एक प्रभावी योगासन आहे. या आसनामध्ये शरीराचा आकार वर्तुळासारखा दिसतो, म्हणून याला वर्तुळासन असे म्हणतात. हे आसन शरीराची लवचिकता वाढविण्यास, खांदे व पाठीच्या स्नायूंना सक्रिय करण्यास आणि संतुलन सुधारण्यास मदत करते. जर तुम्हाला हलासन (Halasana) योग्य प्रकारे करता येत असेल, तर वर्तुळासन शिकणे तुलनेने सोपे जाऊ शकते. वर्तुळासन म्हणजे काय? वर्तुळासन हे पाठीवर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये पाय डोक्याच्या मागे नेत दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडले जातात. शरीराची लवचिकता, संतुलन आणि स्नायूंचे नियंत्रण यासाठी हे आसन उपयुक्त मानले जाते. वर्तुळासन करण्यापूर्वी कोणती आसने करावीत? वर्तुळासन करण्यापूर्वी शरीराची तयारी करण्यासाठी खालील आसने करू शकता. पवनमुक्तासन भुजंगासन पश्चिमोत्तानासन हलासन सर्वांगासन यामुळे शरीर अधिक लवचिक होण्यास मदत होते. वर्तुळासन करण्याची कृती जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. हळूहळू दोन्ही पाय वर उचलून हलासनाच्या स्थितीत मागे न्या. आता उजव्या हाताने उजव्या पाय...

नौकासन | Naukasana |- पोटाची चरबी कमी होते.

नौकासन  हे आसन  करताना शरीराचा आकार पाण्यात तरंगणाऱ्या नौके सारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन(Naukasana) असे म्हणतात. हे आसन पाठीवर आणि पोटावर झोपून अश्या दोन प्रकारात केले जाते. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीच्या व पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे मेरुदंड सुद्धा मजबूत बनतो. बरेच लोक पोटावरील अनियंत्रित वाढलेल्या चरबीने त्रस्त असतात, या आसनाच्या नियमित सरावाने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. येथे आपण नौकासनाबद्दल मराठी मध्ये माहिती घेऊयात.  pic credit:  naukasana कृती १: प्रथम पाठीवर झोपावे.  दोन्ही हात शरीराला समांतर लागून सरळ ठेवावे.  आता श्वास बाहेर सोडून हळूहळू दोन्ही पाय वर उचलावीत.  पाय वर उचलत असतानाच आपले मस्तक, धड व हात हळू हळू वर उचलावे.  आपल्या शरीराचा आकार अर्धगोलावस्तेत आकृतीत दाखविल्याप्रमाणे तोलून धरावा.  १० ते १५ सेकंड या स्तिथीत  थांबून आधी पाय व  नंतर धड व डोके खाली टेकवावे.  फायदे: या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटांच्या स्नायूंना...

गर्भासन मराठी माहिती | Garbhasana Steps and Benefits

गर्भासन  या आसनावस्थेत आपल्या शरीराचा आकार, मातेच्या गर्भात असलेल्या बाळा सारखा दिसतो, म्हणून या आसनास गर्भासन(Garbhasan) असे म्हणतात. पोटाच्या सर्व आजारांवर खात्रीशील उपाय म्हणजेच गर्भासन .  या आसनाच्या नियमित सरावामुळे कफ, अपचन, आतड्यांवरची सूज, जीर्णज्वर व बद्धकोष्ठता यांसारखे विकार नाहीसे होतात.  या आसनाची कृती आणि संपूर्ण फायदे (Garbhasana steps and benefits) या बद्दल आपण खाली मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.  कृती : (Garbhasana steps)    आधी जमिनीवर पद्मासन अवस्थेत बसावे. आता दोन्ही हात कोपऱ्यापर्यंत पायाच्या पोटऱ्यात घालावेत .  नंतर उजव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि डाव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडा.     हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा नाहीतर पाठीवर पडण्याची शक्यता असते. जर हे आसन         करणे फारच कठीण जात असेल तर पद्मासन न घालताही हे आसन करता येते.     सुरुवातीला ८ ते १० सेकंद आसनव्यवस्था राखावी नंतर हळूहळू सरावा नंतर वेळ वाढवत नेऊन आपण...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...

तोलांगुलासन | Tolangulasana

तोलांगुलासन   या आसनस्तिथीत शरीराचा आकार तराजू सारखा दिसतो म्हणून या आसनाला  तोलांगुलासन(Tolangulasana) असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी खूपच सोपे आहे. हे आसन करत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर व नितंबावर पडतो त्यामुळे आपले खांदे, हात व पाठीचा मणका मजबूत बनतो. या आसनाच्या सरावामुळे कमरेवरची व पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनाची कृती व फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये बघुयात.  कृती: प्रथम आपल्या आसनावर पद्मासन घालून बसा. आता दोन्ही हाताचे पंजे निताम्बाखाली ठेऊन  झोपा. जर पंजे नितंबाखाली ठेऊन झोपणे अवघड जात असेल तर हातांच्या कोपराच्या साह्याने पद्मासनाची संपूर्ण बैठक उचलून भार कमरेवर आणा. आता मान व डोके जास्तीत जास्त पुढे उचलून धरा. मान व डोके पुढे उचलून धरल्यानंतर जितक्या वेळ श्वास रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरा, नंतर हळू हळू श्वास बाहेर सोडा, डोळे उघडे ठेवा. आता शरीर ताणलेल्या अवस्थेत ठेवा आणि श्वासोश्वास चालू राहू द्या. हि कृती करताना आपल्या शरीरांच्या स्नायूंवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ...

सेतुबंधासन व त्याचे फायदे | Bridge Pose & its Benefits

  'सेतू ' म्हणजे पूल. या आसनात शरीराचा आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास 'सेतुबंधासन,(setu bandhasana) असे म्हणतात.  हे एक उपयुक्त आसन असल्यामुळे सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी ते करण्याचा प्रयत्न करावा.  या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊन  फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व तसेच उच्च रक्तदाब, दमा, ऑस्टिओपोरोसिस, सायनस या सारखे आजार दूर करते. या आसनाचा सराव आपल्याला तणाव मुक्त करू शकते. जर तुमची नेहमीच चीड चीड होत असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ताण येत असेल तर या आसनाच्या सरावामुळे तुमचे मन शांत होऊन तुमचा ताण कमी होण्यास मदत होते. येथे आपण सेतुबंधासनाची कृती आणि फायद्याबद्दल(setu bandhasana in marathi) मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात.  https://www.flickr.com/photos/yogamama-co-uk/3794906358 कृती:(Setubandhasana Steps) जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. आता गुडघे वाकवून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचला. कंबरेला आकृतीत दाखवल्या प्रमाणे हातांचा आधार द्या. डोके, मान व  खांदे जमिनीवर टेकलेले असू द्या. सहजपणे श्व...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...