नौकासन
हे आसन करताना शरीराचा आकार पाण्यात तरंगणाऱ्या नौके सारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन(Naukasana) असे म्हणतात. हे आसन पाठीवर आणि पोटावर झोपून अश्या दोन प्रकारात केले जाते. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीच्या व पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे मेरुदंड सुद्धा मजबूत बनतो. बरेच लोक पोटावरील अनियंत्रित वाढलेल्या चरबीने त्रस्त असतात, या आसनाच्या नियमित सरावाने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. येथे आपण नौकासनाबद्दल मराठी मध्ये माहिती घेऊयात.
![]() |
| pic credit: naukasana |
कृती १:
- प्रथम पाठीवर झोपावे.
- दोन्ही हात शरीराला समांतर लागून सरळ ठेवावे.
- आता श्वास बाहेर सोडून हळूहळू दोन्ही पाय वर उचलावीत.
- पाय वर उचलत असतानाच आपले मस्तक, धड व हात हळू हळू वर उचलावे.
- आपल्या शरीराचा आकार अर्धगोलावस्तेत आकृतीत दाखविल्याप्रमाणे तोलून धरावा.
- १० ते १५ सेकंड या स्तिथीत थांबून आधी पाय व नंतर धड व डोके खाली टेकवावे.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.
- पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे मांड्यांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.
- या आसनाच्या सरावामुळे हर्निया सारखे आजार होत नाहीत.
कृती २:
- आता आपण पोटावर झोपून केल्या जाणाऱ्या नौकासनाची कृती बघुयात.
- आता पोटावर पालथे झोपून दोन्ही हात सरळ पुढे लांबून ठेवावीत.
- हाताचे पंजे जमिनीला चिटकून ठेववावीत.
- आता हलकासा श्वास घेऊन दोन्ही पाय शलभासना प्रमाणे ताठ ठेवून वर उचलावे.
- याच सोबत दोन्ही हात, डोके व छाती हळू हळू वर उचलावी व वर बघावे.
- १० ते १५ सेकंड या आसनस्थितीत राहून हळूहळू पूर्व स्थितीत यावे.
- आपण हे आसन एक किंवा ते वेळा करू शकतो.
- आसन करून झाल्यावर काहीवेळा मकरासनात विश्रांती घ्यावी.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीच्या मणक्याला भरपूर व्यायाम मिळतो.
- पोटावर ताण पडून पोटाचे स्नायू मजबूत बनतात.
- पोटाची चरबी कमी होते.
- पचनसंस्था मजबूत बनते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
टीप : ज्यांना पोटाचे विकार, कंबर दुखी, उच्च रक्तदाब या सारखे विकार आहेत त्यांनी हे आसन करू नये.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏