योगासने का करावीत ? नियमित योग अभ्यासाचे आपल्याला होणारे फायदे जाणून घेण्याआधी आपण नियमित योगाभ्यास किंवा योगासने का करावी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजच्या या विज्ञान युगात आपली जीवनशैली फार बदललेली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण खूप आळशी बनत चाललो आहोत. वेळ वाचविण्यासाठी आपण घरापासून थोडे अंतरावर जाण्यासाठी सुद्धा गाडी वापरतो. घरातून खाली उतरण्यासाठी लिफ्ट चा वापर करतो. या मुळे शरीरातील स्थूलपणा वाढत चालला आहे. चैनीच्या वस्तूंचा वापर करण्यासाठी इथे विरोध करत नाही परंतु त्याच चैनीच्या वस्तू जर आपल्या शरीरासाठी धोकादायक बनत असतील तर त्यांचा उपयोग कमी करायला हवा. आपली शारीरिक हालचाल खूप कमी होत चालली आहे तसेच या स्पर्धेच्या युगात घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावण्याच्या सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत आहे त्यामुळे शुगर, बीपी, पोट साफ न होणे, एसिडिटी, मानसिक रोग, नैराश्य या सारखे आजार होण्याचा धोका वाढत चालला आहे. शरीराला व्यायाम मिळण्यासाठी प्रत्येकालाच जिम लावणे परवडण्यासारखे नाह...
Learn Automation Testing, Playwright, AI, Software Testing, and Personal Growth. Practical tutorials, coding guides, interview preparation, yoga, and real-life experiences.