भद्रासन (Bhadrasana) भद्रासनालाच बद्धकोनासन असे सुद्धा म्हणतात. भद्रासनाच्या सरावामुळे पायाच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आपल्या पायांची आणि मांड्यांची लवचिकता वाढते. तसेच कंबरदुखी, डोकेदुखी, उलटी, दमा या सारख्या अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या चंचल मनावर ताबा मिळवण्यासाठी हे आसन फार उपयुक्त असून या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे मनःशांती मिळते. भद्रासनच्या सरावामुळे मुलचक्र कार्यान्वित होते. हे आसन करण्यासाठी अत्यंत सोपे आणि आरामदायी असल्यामुळे आपण या आसनाचा सराव भरपूर वेळेपर्यंत करू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये भद्रासन हे ध्यानधारणे साठी उत्तम असे आसन आहे असे सांगितले आहे. खाली आपण भद्रासनाची कृती आणि फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती बघुयात.(Bhadrasana information in marathi) pic credit: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/64/Baddha_konasana.jpg कृती: सर्वप्रथम जमिनीवर पांघरलेल्या आसनावर पाय सरळ लांबवून बसावे. आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पा...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...