पद्मासन(Padmasana )
कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास (Yoga) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. (Padmasana steps and benefits information in Marathi)
आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया. पद्म म्हणजे कमळ, जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला 'Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.
चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'?
कृती :(Padmasana Steps)
- जमिनीवर पाय लांब पसरवून बसावे.
- नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत व डावा पाय उजव्या पायाच्या जांघेत व्यवस्तीत ठेवावा.
- उजवा पाय आधी ठेवता येत येत नसेल तर डाव्या पायाने सुरुवात केली तरी चालेल.
- दोन्ही हातांचे अंगठे व तर्जनीची (अंगठ्याजवळील बोट) एकमेकांना चिटकवून डावा हात डाव्या गुडघ्यावर व उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा.
- पाठीचा कणा आणि डोके सरळ रेषेत ठेवावे.
- डोळे बंद करून ध्यानस्थ बसावे.
![]() |
| Photo by Elina Fairytale from Pexels |
जाड शरीर यष्टीचा लोकांना पद्मासन घालणे कठीण जाते तेंव्हा त्यांनी एका पायाने म्हणजे अर्ध पद्मासनात बसले तरी चालेल. परंतु पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करत राहावे, काही दिवसांच्या सरावानंतर आपण सहज पणे पद्मासन करू शकतो.
सुरुवातील १ ते २ मिनिटेच या आसनाचा सराव करावा, काही दिवसांच्या सरावानंतर तुम्ही वेळ वाढवू शकता.
पद्मासनाचे फायदे (Benefits of Padmasana) :
- या आसनाच्या नित्य सरावाने मनःशांती प्राप्त
- निद्रानाशाचा विकार असणाऱ्या रुग्णांसाठी हे आसन वरदानरूप आहे.
- या आसनामुळे अंतःस्रावी ग्रंथी (Endocrine Glands) कार्यक्षम बनतात .
- या आसनामुळे शरीरातील मेद कमी होतो आणि उत्साह (Vitality) वाढतो .
- दमा, निद्रानाश, व हिस्टेरियासारखे रोग नाहीसे होतात.


खूप छान माहिती. धन्यवाद
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!
DeleteMast dada
ReplyDeleteThnq
ReplyDeleteमी काही प्राणायाम व योगाभ्यास करतो. त्याच्याबरोबर मिळालेळी तुमची माहिती सुद्धा खूप उपयुक्त आहे. धन्यवाद.
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!
Deleteमाला सुद्धा ही माहीती खुप आवडली👌
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!
Deleteखुप छान माहिती
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!
Deleteखूपच छान माहिती दिली आहेत तुम्ही आम्ही अशा खूप गोष्टी सर्च करतो पण त्यातून तुमची माहिती खूप चांगली आहे. धन्यवाद !
Deleteखुप छान माहिती
ReplyDeleteVery Fruitful Information , Keep Sharing sucha valuable content .
ReplyDeleteGreat ,👍👍
ReplyDelete