Skip to main content

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन(Padmasana )

कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास (Yoga) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. (Padmasana steps and benefits information in Marathi)

Padmasana
Photo by Elina Fairytale from Pexels


आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया. पद्म म्हणजे कमळ, जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला 'Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.

 चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'?

कृती :(Padmasana Steps)

  •  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे. 
  • नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत व डावा पाय उजव्या पायाच्या जांघेत व्यवस्तीत ठेवावा. 
  • उजवा पाय आधी ठेवता येत येत नसेल तर डाव्या पायाने सुरुवात केली तरी चालेल. 
  • दोन्ही हातांचे अंगठे व तर्जनीची (अंगठ्याजवळील बोट) एकमेकांना चिटकवून डावा हात डाव्या गुडघ्यावर व उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. 
  • पाठीचा कणा आणि डोके सरळ रेषेत ठेवावे.
  • डोळे बंद करून ध्यानस्थ बसावे. 
                
Padmasana steps
Photo by Elina Fairytale from Pexels

जाड शरीर यष्टीचा लोकांना पद्मासन घालणे कठीण जाते तेंव्हा त्यांनी एका पायाने म्हणजे अर्ध पद्मासनात बसले तरी चालेल. परंतु पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करत राहावे, काही दिवसांच्या सरावानंतर आपण सहज पणे पद्मासन करू शकतो. 
    सुरुवातील १ ते २ मिनिटेच या आसनाचा सराव करावा, काही दिवसांच्या सरावानंतर तुम्ही वेळ वाढवू शकता. 

पद्मासनाचे फायदे (Benefits of Padmasana) :                                     

  1. या आसनाच्या नित्य सरावाने मनःशांती प्राप्त 
  2. निद्रानाशाचा विकार असणाऱ्या रुग्णांसाठी हे आसन वरदानरूप आहे. 
  3. या आसनामुळे अंतःस्रावी ग्रंथी (Endocrine Glands) कार्यक्षम बनतात . 
  4. या आसनामुळे शरीरातील मेद कमी होतो आणि उत्साह (Vitality) वाढतो . 
  5. दमा, निद्रानाश, व हिस्टेरियासारखे रोग नाहीसे होतात. 

Comments

  1. खूप छान माहिती. धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!

      Delete
  2. मी काही प्राणायाम व योगाभ्यास करतो. त्याच्याबरोबर मिळालेळी तुमची माहिती सुद्धा खूप उपयुक्त आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!

      Delete
  3. माला सुद्धा ही माहीती खुप आवडली👌

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!

      Delete
  4. खुप छान माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार!

      Delete
    2. खूपच छान माहिती दिली आहेत तुम्ही आम्ही अशा खूप गोष्टी सर्च करतो पण त्यातून तुमची माहिती खूप चांगली आहे. धन्यवाद !

      Delete
  5. खुप छान माहिती

    ReplyDelete
  6. Very Fruitful Information , Keep Sharing sucha valuable content .

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...