Skip to main content

भद्रासन मराठी माहिती | Bhadrasana information in marathi

भद्रासन (Bhadrasana)

भद्रासनालाच बद्धकोनासन असे सुद्धा म्हणतात. भद्रासनाच्या सरावामुळे पायाच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आपल्या पायांची आणि मांड्यांची लवचिकता वाढते. तसेच कंबरदुखी, डोकेदुखी, उलटी, दमा या सारख्या अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या चंचल मनावर ताबा मिळवण्यासाठी हे आसन फार उपयुक्त असून या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच या आसनाच्या नियमित  सरावामुळे मनःशांती मिळते. भद्रासनच्या सरावामुळे मुलचक्र कार्यान्वित होते. हे आसन करण्यासाठी अत्यंत सोपे आणि आरामदायी असल्यामुळे आपण या आसनाचा सराव भरपूर वेळेपर्यंत करू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये भद्रासन हे ध्यानधारणे साठी उत्तम असे आसन आहे असे सांगितले आहे. खाली आपण भद्रासनाची कृती आणि फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती बघुयात.(Bhadrasana information in marathi) 

pic credit: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/64/Baddha_konasana.jpg

कृती:

  • सर्वप्रथम जमिनीवर पांघरलेल्या आसनावर पाय सरळ लांबवून बसावे. 
  • आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पायाचे तळवे एकमेकांना जोडावे. 
  • दोन्ही हातानी पायाचे चवडे पकडून शक्य होईल तेवढे आतल्या बाजूस ओढावे. 
  • हि कृती करताना आपले पाय जमिनीला टेकलेले असावे तसेच आपल्या पाठीचा कणा ताठ असावा.
  • आता आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष असू द्या, हि आसनाची शेवटची स्थिती आहे. 
  • शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही या आसन स्थितीत बसू शकता. 

फायदे:

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे मन शांत होते व आपली स्मरण शक्ती वाढते. 
  2. या आसनाच्या सरावामुळे पायांच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. 
  3. आपली पचन शक्ती या आसनाच्या नियमित सरावाने सुधारते. 
  4. कंबरदुखी, डोकेदुखी, दमा, उचकी, उलटी, या सारख्या समस्या या आसनाच्या सरावाने नाहीश्या होतात. 
  5. या आसनाच्या नियमित सरावाने फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते. 
  6. या आसनाच्या सरावाने मूळव्याध मध्ये होणारा रक्तस्त्राव कमी होतो. 
  7. ब्रह्मचार्य पालनाकरिता हे आसन उपयुक्त आहे. 

Comments

  1. माहीती खुप छान होती मला खुप आवडली👍👌

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...