भद्रासन (Bhadrasana)
भद्रासनालाच बद्धकोनासन असे सुद्धा म्हणतात. भद्रासनाच्या सरावामुळे पायाच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आपल्या पायांची आणि मांड्यांची लवचिकता वाढते. तसेच कंबरदुखी, डोकेदुखी, उलटी, दमा या सारख्या अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या चंचल मनावर ताबा मिळवण्यासाठी हे आसन फार उपयुक्त असून या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे मनःशांती मिळते. भद्रासनच्या सरावामुळे मुलचक्र कार्यान्वित होते. हे आसन करण्यासाठी अत्यंत सोपे आणि आरामदायी असल्यामुळे आपण या आसनाचा सराव भरपूर वेळेपर्यंत करू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये भद्रासन हे ध्यानधारणे साठी उत्तम असे आसन आहे असे सांगितले आहे. खाली आपण भद्रासनाची कृती आणि फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती बघुयात.(Bhadrasana information in marathi)
![]() |
| pic credit: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/64/Baddha_konasana.jpg |
कृती:
- सर्वप्रथम जमिनीवर पांघरलेल्या आसनावर पाय सरळ लांबवून बसावे.
- आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पायाचे तळवे एकमेकांना जोडावे.
- दोन्ही हातानी पायाचे चवडे पकडून शक्य होईल तेवढे आतल्या बाजूस ओढावे.
- हि कृती करताना आपले पाय जमिनीला टेकलेले असावे तसेच आपल्या पाठीचा कणा ताठ असावा.
- आता आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष असू द्या, हि आसनाची शेवटची स्थिती आहे.
- शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही या आसन स्थितीत बसू शकता.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे मन शांत होते व आपली स्मरण शक्ती वाढते.
- या आसनाच्या सरावामुळे पायांच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो.
- आपली पचन शक्ती या आसनाच्या नियमित सरावाने सुधारते.
- कंबरदुखी, डोकेदुखी, दमा, उचकी, उलटी, या सारख्या समस्या या आसनाच्या सरावाने नाहीश्या होतात.
- या आसनाच्या नियमित सरावाने फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.
- या आसनाच्या सरावाने मूळव्याध मध्ये होणारा रक्तस्त्राव कमी होतो.
- ब्रह्मचार्य पालनाकरिता हे आसन उपयुक्त आहे.

माहीती खुप छान होती मला खुप आवडली👍👌
ReplyDeleteKhup Chan aavdal mala
Delete