हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.
भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi)
![]() |
| image credit: https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ |
कृती:
- पोटावर पालथे झोपा.
- दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.
- कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.
- आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.
- आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.
- चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही पाय धरा.
- आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.
- आता पाय वर खेचा, हे करत असताना हात सुद्धा खेचल्या जातील व छाती आणखी वर उचलल्या जाईल.
- या स्थितीत आल्यावर श्वास काही सेकंदासाठी रोखून ठेवा व लगेच हळूहळू बाहेर सोडा.
- आता या स्तिथीत शरीराला मागे पुढे आणि उजव्या व डाव्या बाजूला हळुवार पणे हलवावे.
- हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार नाभीच्या भागावर येतो.
- हे आसन करताना शरीराला काही इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.
- आतडे कार्यक्षम बनतात व आपली पचनशक्ती सुधारते.
- या असणामध्ये पोटातील अवयवांना भरपूर रक्तपुरवठा मिळतो त्यामुळे ते सुधृढ व मजबूत बनतात.
- बद्धकोष्टता व जठराचे विविध आजार या आसनाच्या सरावामुळे दूर होतात.
- या आसनाच्या सरावामुळे पोटात होणाऱ्या गॅसेस च्या त्रासापासून मुक्तता मिळते.
- आतड्यांच्या विविध विकारांवर हे आसन म्हणजे एक रामबाण उपाय.
- हालासनाप्रमाणेच या आसनाच्या सरावामुळे आपला मेरुदंड लवचिक बनतो.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पायाचा, हाताचा व गुडघ्यांच्या संधिवाताचा त्रास दूर होतो.
- हे आसन केल्याने स्वादुपिंड कार्यक्षम बनते त्यामुळे शरीरात पुरेश्या प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते.
- मासिक पाळीतील अनियमितता व प्रजननतंत्रातील तक्रारी या आसनाच्या सरावामुळे दूर होतात त्यामुळे स्त्रियांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.
टीप: शरीराचा संपूर्ण भार पॊटावर पडत असल्याने हे आसन पोट रिकामे असताना करावे.

Very Informative 👍🏻 Have started doing this from today only
ReplyDeleteWaiting for the next blog ☺️
Keep going and spreading knowledge sir 👏🏻