Skip to main content

हलासनाचे फायदे | Benefits of Halasana

हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगराप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला 'हलासन' असे म्हणतात. येथे आपण हलासनाचे फायदे (Benefits of Halasana) आणि क्रिया(Halasana Steps)बघणार आहोत. हालासनामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते, तसेच लैंगिक शक्ती सुद्धा वाढते. या सारखे भरपूर फायदे व त्यांची मराठी मध्ये माहिती (Halasana information in Marathi) आपण पुढे बघणार आहोत. 
                                          
Halasana
pic credit: https://pixahive.com/photo/plow-pose-halasana/


कृती(Halasana Steps):
  •  सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपा.
  • आपले दोन्ही हात शरीराला सामन्तर ठेवा व हाताचे तळवे जामिनाला लागून ठेवा. 
  • दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताठ ठेवा.
  • आता श्वास घेत घेत हळू हळू दोन्ही पाय सोबत वर उचला.
  • श्वास घेण्याची आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे.
  • हि क्रिया करत असताना गुढघ्यात पाय वाकणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या. 
  • हि क्रिया करताना हात आणि पाठ जमिनीला चिटकवून राहूद्या. 
  • आता पाय नव्वद औंशाच्या कोनात आल्यावर श्वास सोडण्याची व पाय डोक्याकडे नेण्याची क्रिया चालू करा.
  • डोक्याकडे आलेले पाय हळूहळू जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 
  • हि क्रिया करताना पाय जुळले ठेवा व पाय गुडघ्यात वाकणार नाहीत याची काळजी घ्या.
  • पायांचे अंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, सुरुवातील असे करता येणार नाही परंतु हळू हळू सरावानंतर हि क्रिया सहज करता येईल. 
  • आता श्वासोश्वास चालू ठेवा, परंतु तोंडाने श्वास घेऊ नका. 
  • शेवटच्या स्तिथीत हनुवटी गळ्यास चिकटणे आवश्यक आहे.

या स्तिथीत आठ ते दहा सेकंद राहा. नंतर हळू हळू पाय लांब रेषेत आणून शरीराला हिसका बसू न देता पाय जमिनीवर आना. 

फायदे(Halasana Benefits):

  • या आसनात पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळतो, त्यामुळे पाठीच्या कण्यातील नाड्या, पाठीचे स्नायू, पाठीचे मणके व मणक्याच्या दोन्ही बाजूंनी निघणारे मज्जातंतू सुदृढ बनतात. 
  • हलासनाचा नियमित सराव करणाऱ्या वक्ती चपळ, स्फूर्तिशील व ताकतवान असतात. 
  • या आसनामुळे संधिवात, कटिशूळ,लचक भरणे, ज्ञानतंतूंना सूज येणे अश्या इत्यादी तक्रारी दूर होतात. 
  • दीर्घकालीन बद्धकोष्टता(constipation), पोटशूळ आणि यकृत व प्लीहा(पाणथरी) यासारखे विकार या आसनाने बरे होतात. 
  • या आसनाच्या नियमित सरावाने शरीरात नवचैतन्य निर्माण होते. तारुण्य सळसळत राहते व लैंगिक शक्तीही वाढते. 
  • या आसनामुळे पोटातील स्नायू सुदृढ बनतात. 
  • या आसनाच्या नियमित सरावाने चेहरा तेजस्वी दिसतो.
  • या आसनामुळे रक्ताभिसरणाची क्रिया चांगली व सुरळीत होते. 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...