Skip to main content

पश्चिमोत्तानासन कृती आणि फायदे | Benefits of Paschimottanasana

 पश्चिमोत्तानासन 

जमिनीवर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन असून, हे आसन करण्यासाठी थोडे अवघड आहे. या आसनाला उग्रासन असे सुद्धा म्हणतात. पश्चिमोत्तासनच्या नियमित सरावामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधी असणाऱ्या तक्रारी या आसनाच्या सरावाने कमी होतात. तसेच मनाची चंचलता या आसनाच्या सरावाने कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल आपण संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Information and benefits of Paschimottanasana in marathi) 
Paschimottanasana
pic credit- https://pixahive.com/photo/back-bend-yoga-paschimottanasana/

कृती:

  • आपल्या योगा करण्याच्या आसनावर आपले पाय लांब पसरवून बसा. 
  • आता कमरेमध्ये हळू हळू समोर वाकून आपल्या दोन्ही पायाचे अंगठे पकडा. 
  • हि कृती करताना आपले दोन्ही पाय ताठ राहतील याची दक्षता घ्या. 
  • सुरुवातीला अंगठे पकडता नाही आले तर आपल्या दोन्ही पायांचे घोटे पकडले तरी चालतील. 
  • आता श्वास बाहेर सोडून आपले मस्तक आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. 
  • या स्थितीत आल्या नंतर आपले दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकतील याची काळजी घ्या. 
  • हि आसनाची शेवटची स्थिती आहे या स्थिती मध्ये आल्यानंतर आपला श्वासोश्वास संथ गतीने चालू द्या. 
  • सुरुवातीला काही दिवस तुम्हला असे करण्यास थोडे परिश्रम लागतील परंतु नियमित सराव केल्यास तुम्ही हि कृती अगदी सहज करू शकाल. 
  • सुरुवातीच्या काळात हे आसन ५ सेकंदापर्यंतच करावे, नंतर काही दिवसांच्या सरावानंतर आपण हे आसन ३० सेकंदापासून तर १० मिनिटापर्यंत करू शकता. 
  • हे आसन सोडताना सुरुवातीला पायाची बोटे सोडावी मग हळू हळू डोके आणि मान वर घ्यावी. 

फायदे:

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबी कमी होते. 
  2. या आसनाच्या सरावामुळे पित्ताशय, जठार, आणि मूत्राशय या सारख्या पोटामधील अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो. 
  3. या आसनाचा सराव पचनशक्ती सुधारते आणि मजबूत बनवते. 
  4. पोटऱ्या पासून तर माने पर्यंतचे सर्व अवयव या आसनाच्या सरावाने बळकट बनतात. 
  5. तसेच मेरुदंड लवचिक बनतो. 
  6. या आसनाच्या सरावाने मन शांत होऊन मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते. 
  7. या आसनाच्या सरावामुळे स्त्रियांमधील मासिक पाळी संबंधीच्या तक्रारी दूर होतात. 
  8. मधुमेहींच्या रुग्णांना सुद्धा हे आसन फार उपयुक्त आहे. 
महत्वाची सूचना: पॊन्डिलिसिस चा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आपल्या डॉक्टर च्या सल्ल्या शिवाय हे आसन करू नये. तसेच हे आसन करताना किंवा सोडताना आपल्या शरीराला हिसके देऊ नये. 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...