सुप्तभद्रासन
आज आपण सुप्तभद्रासनाचे फायदे(supta bhadrasana benefits) आणि त्याची कृती या बद्दल मराठी मध्ये जाणून घेऊयात. सुप्तभद्रासनालाच 'सुप्तगोरक्षासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये याचे नाव Reclining Bound Angle Pose असे आहे. सुप्तभादर्शनाच्या दोन कृती आहेत, खाली दिलेली आसनांची कृती पूर्ण नीट लक्ष देऊन वाचा आणि मगच हे आसन कृतीत आणा.
कृती:
प्रकार १:
![]() |
| pic credit: https://pixahive.com/photo/supta-baddha-konasana-recliner-bound-angle-pose/ |
- सुरुवातीला जमिनीवर सरळ पाठीवर झोपा.
- आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या पायाची टाच जननेंनद्रिय व गुद्द्वाराच्या मध्ये असणाऱ्या भागात आना हीच कृती डाव्या पायाने करा.
- दोन्ही पायांच्या टाचा एकमेकाना चिटकायला हव्यात.
- आपला जानेंद्रियाचाव व गुद्द्वाराच्या भागा आणि जोडलेल्या पायांच्या टाचा यात थोडे अंतर असायला हवे.
- आता आपले दोन्ही हात आपल्या मांड्यावर किंवा जमिनीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवा.
सुरुवातीला हे आसन तीस सेकंद करावे, नतंर काही दिवसांच्या सरावानंतर आपण हे आसन पंधरा मिनिटे करू शकतो.
प्रकार २:
- आता आपण दुसऱ्या प्रकाराबद्दल जाणून घेऊयात. पहिला प्रकार केल्या नंतर थोडीशी विश्रांती करूनच दुसरी प्रकार करावा.
- दुसरा प्रकार करण्यासाठी जमिनीवर पाठीवर सरळ झोपून पहिल्या कृतीत यावे.
- आता दोन्ही हातांची बोटे एकमेएकांत गुंफा.
- मस्तक, मान आणि खांदे वर उचलून गुंफलेल्या बोटानी एकमेकांना चिटकलेल्या टाचा पकडा.
- पकडलेल्या टाचा अश्या प्रकारे खेचा कि टाचांनी त्या पायांच्या मांड्या दाबल्या जातील.
तीस सेकंदापर्यंत हि कृती करा, आता दोन्ही हात सरळ करून शरीर सैल सोडा, हळू हळू सरावानंतर आपण हे आसन तीन ते चार मिनिटे करू शकतो.
फायदे:
- या आसनाच्या सरावाने हृदय सुदृड बनते.
- हातापायांचे सांधे आणि स्नायू मजबूत
- हे आसन केल्याने रक्ताभिसरणाची(Blood Circulation) क्रिया चांगल्या प्रकारे होते.
- या आसनामुळे कुंडलिनी शक्तीचे ऊर्ध्वगमन होते.
- शरीराचा प्रत्येक अवयव कार्यक्षम बनतो. त्यामुळे स्वाभाविकच चित्त प्रसन्न राहते व शरीर निरोगी बनते.

bahut hi achh likha hai
ReplyDelete