Skip to main content

Posts

What is Playwright? A Complete Beginner's Guide (2026)

What is Playwright? A Complete Beginner's Guide (2026) Automation testing has become an essential skill for software testers and developers. Instead of performing the same manual tests repeatedly, automation frameworks help execute test cases quickly, accurately, and efficiently. One of the most popular modern automation frameworks is Playwright . If you're planning to start a career in automation testing or looking for an alternative to Selenium, Playwright is an excellent choice. In this article, you'll learn what Playwright is, why Microsoft developed it, its key features, built-in tools, and how it compares with Selenium. What is Playwright? Imagine testing your web application manually every time a developer makes a small change. You have to open the browser, log in, fill forms, click buttons, verify results, and repeat the same process again and again. As projects grow, this becomes time-consuming and prone to human error. This is where Playwright comes in. Playwrigh...

My Journey from Manual Testing to Playwright Automation

Welcome to byyogesh.com . This is my very first automation blog, and I wanted to begin by sharing my own learning journey. A few years ago, I started my career as a Manual Tester . Like many beginners, I had no experience with automation testing or programming. Writing code seemed difficult, and terms like classes , objects , and parameterization sounded confusing. Today, I work with Playwright and TypeScript , and looking back, I realize that the biggest reason for my progress wasn't intelligence—it was consistency . If you're a manual tester wondering whether you can learn automation, I hope my story gives you confidence that you can. Why I Decided to Learn Automation Testing Manual testing helped me understand software testing fundamentals, but I also realized that the industry is rapidly adopting automation. Many companies now expect testers to have automation skills. I wanted to: Grow my career Improve my technical skills Prepare for better job opportunities Stay ...

ड्रॅगन फ्रुट-आरोग्यवर्धक फळ खाण्याचे फायदे -Dragon Fruit

 ड्रॅगन फ्रुट(-Dragon Fruit)  आज आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती जाणून घेऊयात. मूळच सेंट्रल अमेरिकेमध्ये सापडणार हे फळ आता जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज मिळते. हे फळ हायलोसिरीअस (Hylocereus)  नावाच्या कॅटकस प्रकारांमधील आहे. या मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः त्यात दोन सामान्य प्रकार सगळीकडे मिळतात ते म्हणजे हायलोसेरियस अँडाट्स (Hylocereus Undatus) जे आतून पांढरे असते आणि हायलोसेरियस कोस्टारिसेंसीस जे आतमधून लाल किंवा गुलाबी असते.  ड्रॅगन फ्रुट हे नाव त्या फळाच्या बाह्य आकारावरून त्याला मिळाले आहे.  हे फळ त्याच्या दिसण्यावरून प्रसिद्ध तर आहेच त्याच बरोबर ते त्याच्या विशिष्ट चव आणि त्यात असणाऱ्या विविध पौष्टिक जीवनसत्वाबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात.  जीवनसत्वे : जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स, ड्रॅगन फ्रुट मध्ये क जीवनसत्व(व्हिटॅमिन सी ) विपुल प्रमाणात आहे, जे अँटिऑक्सिडन असल्यामुळे त्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने आपली त्वचा सुद्...

हस्त मुद्रा शास्त्र!(Hasta Mudra Shastra!)

हस्तमुद्रा म्हणजे काय? आता पर्यंत आपण विविध योगासनाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या ब्लॉग मध्ये आपण हस्तमुद्रा म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  असे मानल्या जाते कि आपले शरीर हे पंचतत्त्व म्हणजे पाच तत्त्वांपासून बनले आहे. हि पंचतत्त्व म्हणजेच अग्नी, वायू, जल, पृथी, आणि आकाश . आपल्या शरीरातील ह्या तत्वांचे प्रमाण बिघडल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते.  योग आणि हस्तमुद्रा हि ५००० वर्षे जुनी पद्धती आहे. ज्याच्या नियमित सरावामुळे आपण आपले आरोग्य निरोगी बनवू शकतो.    योगासना सोबतच हस्तमुद्रांचा सराव केल्यास आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हस्तमुद्रा या शब्दाची फोड केल्यास हस्त म्हणजे हात आणि मुद्रा म्हणजे एक विशिष्ट्य आकार असा होतो. योगासना मध्ये आपल्या हाताला एक अनन्य साधारण महत्व आहे जे आपल्या शरीरातील विविध नाड्याना जोडलेले असतात. आणि या नाड्यांमधुन आपल्या शरीरातील ऊर्जा  वाहण्याचे कार्य चालू असते. हस्तमुद्रांच्या सरावामुळे आपण या ऊर्जावाहन्यांवर प्रभाव टाकू शकतो व आपले आरोग्य सुधारू शकतो. हस्तमुद्रांचा सराव आप...

उष्माघात म्हणजे काय? What is Heat Stroke?

उष्माघात म्हणजे काय?  (What is Heat Stroke?) नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड, सर्वप्रथम Y oga Today ब्लॉग च्या वाचकांचे खूप खूप स्वागत. मी सुद्धा या ब्लॉग चा नियमित वाचक असून सदर ब्लॉग मध्ये योगासनाबद्दल दिलेली माहिती हि निरोगी जीवनशैली साठी फार उपयोगाची आहे. आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे. या तापमानवाढी मुळे उष्माघाताचा बातम्या आपण वृत्तपत्रांमधून वाचतो. उष्माघात म्हणजे काय?   उष्माघात  कश्यामुळे होतो?  त्यापासून बचावा करिता आपण घरघुती काय उपाययोजना करू शकतो. या बद्दल ची माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध व्हावी, त्यासाठी ह्या ब्लॉग च्या निर्मात्याने मला उष्माघाताबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने सदर ब्लॉग मध्ये मी उष्माघाताबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.  उष्माघात म्हणजे काय? सुरुवातीला आपण उष्माघात म्हणजे काय? हे जाणून घेऊयात.  उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक ( heat stroke ) शरीराने गरजेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा शोषून घेतली तर अतिउच्च तापमानाचा आजार होतो त्यालाच हायपरथर्मिया (hyperthermia) असे म्हणतात. ...

कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

 सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे : आपण या लेखामध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. या क्रियेला आयुर्वेदामध्ये उषःपान असे म्हटले जाते.   ककचंडीश्वर_कल्पतंत्र" या आयुर्वेदिक ग्रंथात रात्रीच्या पूर्वार्धात पाणी पिणे विषारी असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री प्यालेले पाणी ‘दुधा’सारखे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आणि सकाळी (सुर्योदयापूर्वी) प्यायलेले पाणी आईच्या दुधाइतकेच फायदेशीर आहे असे म्हणतात . उषःपान या शब्दाची फोड केल्यास उषा म्हणजे सकाळ आणि पान म्हणजे पाणी असा होतो. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आजारापासून वाचवता येते. तसेच आपल्या शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यासाठी ह्या क्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होतो. सध्या बहुतेक लोकांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे वजन कमी कसे करावे? याचे सोपे उत्तर म्हणजे उषःपान. नियमित रोज सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास उषःपान म्हणजे घरच्या घरी केलेली विनामूल्य वॉटर थेरेपी.  Image by: Photo...

ध्यान(Meditation ) म्हणजे काय ?

ध्यान (Meditation ) आज आपण ध्यान म्हणजे काय? , ध्यान साधना कशी करावी तसेच ध्यान साधना करण्याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत.  एका नवीन अध्ययनानुसार मानवी मनात दिवसाला ६००० वेगवेगळे विचार येतात. ज्यावर आपला काहीच निर्बंध नसतो. हे विचार आपल्या काही कामाचे सुद्धा नसतात. या मध्ये चिंता, काळजी, भविष्यात काय होईल याची भीती हे सर्व काही असते. आणि या सतत च्या निर्माण होणाऱ्या विचारणामुळे आपण विविध आजारांना नकळतच आमंत्रण देतो.  ध्यान साधना केल्याने आपण हे मनात येणारे सर्व विचार थांबवू शकतो असे नाही परंतु त्यावर आपण ताबा मिळवू शकतो हे नक्कीच. तसेच नियमित ध्यान (Meditation) केल्याने  नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारात बदलता येते. नियमित ध्यान साधना आपल्या मेंदू मध्ये एक अध्यात्मिक ऊर्जा निर्माण  करते व त्यामुळे आपले मन शांत होते त्याचे फलस्वरूप आपले शारीरिक विकार/आजार दूर होतात. चंचल मनाला स्थिरता मिळाल्यामुळे आपली निर्णय क्षमता सुधारते, आपली एकाग्रता (concentration) वाढते, आपल्या स्मरण शक्ती वाढते. असे सर्व सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात.  ...

Purvottanasana information in Marathi | पूर्वोतानासन मराठी माहिती

पूर्वोतानासन  पूर्वोतानासन, हे आसन करताना आपल्या शरीराचा धडाच भाग वर उचल्या जातो. येथे पूर्व म्हणजेच पूर्व  दिशा नसून आपल्या शरीराचा वरील भाग आणि उत्तानासन म्हणजेच वर उचलणे किंवा खेचून धरणे असा होतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला जीवनातील दैनंदिन ताण तणावापासून मुक्ततता मिळते. तसेच  थॉयरॉईड(Thyroid) ग्रंथीचे कार्य सुधारते   व  आपली शारीरिक कमजोरी दूर  होऊन शरीरात नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. या आसनालाच इंग्रजी मध्ये Upword Plank Pose किंवा East Streaching Pose असे सुद्धा म्हणतात.  पूर्वोतानासन या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जाणून घेऊयात. (Purvottanasan information in marathi) Image Source :  https://pixahive.com/photo/east-streching-pose-purvottanasana/ कृती : आपल्या नियमित योग करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय सरळ लांबवून बसा.  बसलेले असताना आपल्या पाठीचा कणा सुद्धा ताठ ठेवा.  आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील असे चिपकवून राहू द्या.  आत...

Utkatasana Information in Marathi | उत्कटासन मराठी माहिती | Chair Pose

उत्कटासन  या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला उत्साह व जोम वाढविण्यास मदत करतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ (Chair Pose) असे म्हणतात. या आसनाची कृती व फायदे या बद्दल सविस्तर मराठी माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Utkatasana Information in Marath) Image source:  https://pixahive.com/photo/utkatasana-chair-pose/ कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.(साधारणतः ७ ते ९ इंच एवढे अंतर राहूद्या )  या नंतर आपले दोन्ही हात समोर लांबवून आपल्या खांद्याला समांतर राहतील असे राहू द्या.  आपले तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे.  आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका.  असे करताना आपले नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच आपले गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार...

Benefits of Trikonasana | त्रिकोणासन चे फायदे

या आसनाचा सराव करताना आपल्या शरीराची आकृती त्रिकोणासारखी बनते म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे नाव पडले आहे. या आसनाचा सराव करताना आपले शरीर तीन कोनांमध्ये विभागले जाते. या आसनाच्या सरावामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबीचे विघटन होऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते. त्रिकोणासनापासून मिळणारे विविध फायदे व त्याची कृती या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(Trikonasana information and benefits in Marathi) कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर सरळ उभे राहा.  आपले दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर असे चिपकून राहू द्या.  उभे असताना आपल्या दोन्ही पायामधे काही अंतर सोडा. साधारणतः ७५ से.मी.एव्हडे .  आता आपले दोन्ही हात वर उचलून आपल्या खांद्यांना सरळ रेषेत समांतर असे ठेवा.  या स्थितीत आपले हाताचे तळवे हे जमिनीकडे झुकलेले असावे.  आता आपल्या डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा.  असे करत असताना आपला उजवा हात सर...

उत्थित हस्त पादअंगुष्ठासन चे फायदे | Utthita Hasta Padangusthasana Benefits

  उत्थित हस्त पादअंगुष्ठासन  उत्थित हस्त पादअंगुष्ठासन हे आसन पायावर उभे राहून करण्याच्या प्रकारातील आसन आहे. येथे उत्थित म्हणजे वर उचलणे, हस्त म्हणजे हात, पाद किंवा पद म्हणजे पाय आणि अंगुष्ठ म्हणजे अंगठा. तसेच या आसनाला इंग्रजी मध्ये Extended Hand-To-Big-Toe-Pose असे म्हणतात. या आसनाचा सराव केल्याने शारीरिक व मानसिक संतुलन बनून राहते तसेच आपली एकाग्रता वाढते. उत्थित हस्त पादअंगुष्ठासन ची कृती आणि फायदे या बद्दल माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (utthita hasta padangusthasana benefits and steps information in marathi) image source:  https://pixahive.com/photo/utthita-hasta-padangustasana-extended-hand-to-big-toe-2/ कृती:  सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर आपल्या दोन्ही पायावर सरळ उभे राहा.  आता एक खोल श्वास घेऊन आपला उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पोटाजवळ आणा.  आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि आकृतीत दाखवल्या प्रमाणे हळू हळू पाय डोक्याकडे वर उचला.  हि कृती करताना आपला तोल जाणार नाही याची दक्षता घ्या....

शशांकासन नैराश्य दूर करण्यास मदत करते | Shashankasana Marathi Information

शशांकासन  कृती: "शशांक" हा एक संस्कृत शब्द असून त्याचे "ससा" आणि "चंद्र" असे दोन अर्थ होतात. शशांकासन करताना आपल्या शरीराचा आकार एखाद्या सश्याप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला शशांकासन असे म्हणतात. तसेच या आसनाच्या सरावामुळे आपले मन चंद्राप्रमाणे शीतल आणि शांत होते. या आसनाचा नियमित सराव नैराश्य दूर करण्यास मदत करते. हे आसन करताना आपल्या मेंदूला भरपूर आणि सुरळीत रक्तपुरवठा होतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. विद्यार्थ्यांनी या आसनाचा नक्कीच सराव करायला हवा. रागावर नियंत्रण कसे करावे? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास त्याला शशांकसान हेच उत्तर राहील. पुढे आपण शशांकासनापासून होणारे विविध फायदे तसेच त्याची कृती कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेऊयात. (Shashankasana information in marathi) सुरुवातीला आपल्या योग करण्याच्या आसनावर वज्रासनात (वज्रासनाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.) बसावे.  वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपले दोन्ही हात सरळ वर करा.  आता आपले शरीर हलके करून शरीराचा वरचा भाग हळू हळू समोर आणावा. समोर ...

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...