Skip to main content

Benefits of Trikonasana | त्रिकोणासन चे फायदे

या आसनाचा सराव करताना आपल्या शरीराची आकृती त्रिकोणासारखी बनते म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे नाव पडले आहे. या आसनाचा सराव करताना आपले शरीर तीन कोनांमध्ये विभागले जाते. या आसनाच्या सरावामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबीचे विघटन होऊन सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते. त्रिकोणासनापासून मिळणारे विविध फायदे व त्याची कृती या बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(Trikonasana information and benefits in Marathi)
Trikonasana

कृती:

  • सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर सरळ उभे राहा. 
  • आपले दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर असे चिपकून राहू द्या. 
  • उभे असताना आपल्या दोन्ही पायामधे काही अंतर सोडा. साधारणतः ७५ से.मी.एव्हडे . 
  • आता आपले दोन्ही हात वर उचलून आपल्या खांद्यांना सरळ रेषेत समांतर असे ठेवा. 
  • या स्थितीत आपले हाताचे तळवे हे जमिनीकडे झुकलेले असावे. 
  • आता आपल्या डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा. 
  • असे करत असताना आपला उजवा हात सरळ आकाशाकडे वर न्या. 
  • आपली नजर आपल्या उजव्या हाताच्या पंज्याकडे स्थिर करा. (चित्रात नजर खाली आहे, परंतु आपली नजर उजव्या हाताच्या तळव्याकडे असावी.)
  • या अवस्थेत दोन सेंकंद राहा. हि सर्व कृती चालू असताना आपला श्वासोश्वास नियमित चालू ठेवा. 
  • पूर्व स्थितीत आल्या नंतर काही वेळाने हीच कृती आता उजवा हात आणि उजवा पायाने करावी. 

फायदे:

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास भरपूर मदत होते. 
  2. या आसनाचा नियमित सराव कमरेचे आणि पायांचे सांधे मजबूत बनवतो. 
  3. मान व खांद्यांचे सांधे जर दुखत असतील तर या आसनाच्या सरावाने ती तक्रार दूर होते. 
  4. याआसनाचा नियमित सराव ताण तणाव कमी करण्यास मदत करतो. 
  5. या आसनाचा नियमित सराव पाठ दुखीचा त्रास कायमचा घालविण्यासाठी मदत करतो. 
  6. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक शांतता मिळते. 
trikonasana


महत्वाची सूचना: ज्यांना पाठदुखीचा किंवा मानेचा त्रास आहे किंवा मणक्यांमध्ये गॅप आहे त्यांनी या आसनाचा सराव करू नये , किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या आसनाचा सराव करावा. 
गरोदर स्त्रियांनी  या आसनाचा सराव करू नये. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...