उत्थित पद्मासन (Utthita Padmasana) कसे करावे? कृती, फायदे आणि घ्यावयाची काळजी पद्मासनाचा नियमित सराव करणाऱ्या व्यक्तींनी पुढील टप्प्यात कोणते आसन शिकावे, असा प्रश्न पडल्यास उत्थित पद्मासन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दिसायला साधे वाटणारे हे आसन प्रत्यक्षात करताना मात्र हातांची ताकद, शरीराचे संतुलन आणि एकाग्रता या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. पद्मासनाच्या स्थितीत बसून दोन्ही हातांच्या पंजांचा आधार घेत संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलले जाते. यालाच उत्थित पद्मासन असे म्हणतात. पद्मासनाच्या तुलनेत हे आसन करणे थोडे अवघड आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात शरीर पूर्णपणे वर उचलता आले नाही, तरी निराश होण्याचे कारण नाही. चला तर मग, उत्थित पद्मासनाची योग्य कृती, त्याचे फायदे आणि हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. उत्थित पद्मासन म्हणजे काय? (What is Utthita Padmasana?) संस्कृतमध्ये 'उत्थित' म्हणजे वर उचललेले, तर 'पद्म' म्हणजे कमळ. पद्मासनाच्या स्थितीत संपूर्ण शरीर हातांच्या आधाराने जमिनीपासून वर उचलले जात असल्यामुळे या आसनाला उत्थित पद्मासन असे नाव पडले...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...