Skip to main content

योगनिद्रा म्हणजे काय? | Yog Nidra

 योगनिद्रा 

 योगनिद्रा(Yog Nidra) म्हणजे काय? हे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, योगनिद्रा म्हणजे झोपणे आणि जागी राहण्याच्या मधल्या अवस्थेला योगनिद्रा असे म्हणतात. योगनिद्रा करण्याची ठराविक वेळ म्हणजे योगासने करून झाल्यानंतर, कारण योगासने केल्यानंतर आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्माण होते त्या उर्जेला जतन करण्याचे किंवा शरीरात साठवून ठेवण्याचे काम योगनिद्रेद्वारे केले जाते. तसेच योगनिद्रेच्या सरावामुळे निद्रानाश दूर होतो व आपल्याला शांत झोप लागते. हि एकप्रकारची ध्यानमुद्रा असून या ध्यानमुद्रेचा सराव आपण शवासनात करू शकतो. हि मुद्रा करताना आपण आपल्या आवडीचे संगीत किंवा आवडीची गाणी ऐकू शकतो. योगनिद्रेमधे ध्यान कसे लावायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Yog Nidra information in marathi) 

yognidra
 Photo by Karolina Grabowska from Pexels


कृती:

  • प्रथम आपल्या आसनावर(Yoga Mat) शवासनात झोपावे. 
  • आपले दोन्ही हात शरीराच्या अंतर शरीराला समांतर असे ठेवा. 
  • डोळे बंद करून खोल श्वास घ्या आणि बाहेर सोडा. 
  • योगनिद्रा करताना आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष असू द्या, श्वासोश्वास हा झपझप नसावा, आपला श्वास हा खोल आणि लयबद्ध असायला हवा. 
  • आता आपल्या शरीराच्या एका एका अवयवाकडे आपले लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ सुरुवातीला आपल्या उजव्या तळपायाकडे लक्ष केंद्रित करा, त्या अवयवाला शिथिल करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. 
  • आता हळू हळू वर येऊन शरीराच्या बाकी एका एका अवयवांकडे सुद्धा लक्ष केंद्रित करून त्यांना शिथिल करा. 
  • असे करत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना जागृतपणे अनुभवा. 
  • आता शेवटी आपल्या शरीरातील संपूर्ण थकवा नष्ट होऊन एक नवीन उत्साह निर्माण झाल्याची अनुभूती करा. 
  • शेवटच्या टप्प्यात आपल्या आजूबाजूच्या परिसराशी एकरूप होऊन हळुवारपणे डाव्या अंगावर येऊन उठून बसा. 
  • आता खूप सावकाशपणे आपले डोळे उघडा. 

फायदे:

  1. योगनिद्रेच्या सरावामुळे शरीरात उत्पन्न होणारे विषारी द्रव्य बाहेर फेकल्या जातात. 
  2. या आसनाच्या सरावाने निद्रानाश दूर होते व आपल्याला शांत झोप लागते. 
  3. दिवसभराच्या ताण तणावापासून आपल्याला मुक्तता मिळते. 
  4. मनात होणाऱ्या असंख्य विचाराच्या उत्पत्तीला थोडा लगाम मिळतो आपले शरीर आपल्या अंतरात्म्यासोबत जोडले जाते. 
  5. दैनंदिन तणावापासून मुक्तता मिळून मानसिक सुखाची अनुभूती येते. 
महत्वाच्या सूचना:
 हे आसन करताना सैल कपडे वापरावे. आपले आसन मोकळ्या जागेत आणि  जागा सपाट असेल याची काळजी घ्यावी. 
जमिनीवर झोपल्यानंर आपली आसनस्थिती आरामदायी असायला हवी. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...