पर्वतासन
![]() |
| pic credit: https://www.pxfuel.com/en/free-photo-enudt/download |
हे आसन करताना आपल्या शरीराची आकृती पर्वताप्रमाणे बनते. अत्यंत साधे असणारे हे आसन आपल्या शरीराला अनेक फायदे देणारे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसाचे आणि पोटाचे विकार नाहीसे होतात. पाठदुखी साठी एक चांगला उपाय म्हणून आपण हे आसन करू शकतो. या आसनामध्ये शरीराचा समतोल साधला जातो त्याचाच फायदा मन एकाग्र करण्यासाठी होतो. येथे आपण पर्वतासनाची कृती आणि त्याचे फायदे या बद्दल विस्तृत अशी मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात.(Parvatasana information in marathi)
कृती:
- प्रथम आपल्या आसनावर (Yoga Mat वरती) पद्मासनात बसावे.
- दोन्ही हातांचा नमस्कार करून छातीजवळ ठेवा.
- जोडलेले दोन्ही हात हळू हळू डोक्याच्या वर न्या.
- आपल्या दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांना चिपकलेली राहतील
- तसेच दोन्ही हात आपल्या कानांना चिटकतील आणी सरळ वरती ताठ राहतील कोपऱ्या मध्ये वाकणार नाहीत याची काळजी घ्या.
- दोन्ही हात वर नेताना श्वास आत घ्या. हात वरती ताणल्या गेल्यावर काही वेळासाठी श्वास रोखून धरा.
- आता हळू हळू दोन्ही हात खाली आना. हात खाली आणताना हळू हळू श्वास सोडा.
- या आसनाचा ४ ते ५ वेळा सराव करावा.
जर आपल्याला पद्मासन करता येत नसेल तर आपण हे आसन अर्धपद्मासन मध्ये केले तरी चालेल.
फायदे:
- या आसनाच्या नियमित सरावामुळे हातांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.
- पाठीच्या मणक्याला ताण पडून त्याला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे तेथील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत चालते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे मणक्या विषयी असलेल्या सर्व तक्रारी जसे पाठदुखी, कंबरदुखी, मानेचा त्रास दूर होतो.
- हे आसन करताना आपल्याला आपले दोन्ही हात वरती ठेवावे लागत असल्याने प्राणवायूची गती उर्ध्व होते.
- छातीचा भाग सुडौल बनतो.
- या आसनाच्या सरावामुळे आपल्या श्वसन यंत्रणेचा भरपूर व्यायाम होतो त्यामुळे दम्यासारखे आजार होत नाहीत.
- या आसनाच्या सरावामुळे आपल्या शरीराचा समतोल साधल्या जाऊन आपले चित्त एकाग्र होते.
- स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर वक्षस्थळामध्ये आलेला ढिलेपणा कमी करण्यासाठी व त्यांची मूळ स्थिती प्राप्त करण्यासाठी या आसनाचा फार चांगला उपयोग होतो. म्हणूनच स्त्रिया व वयात येणाऱ्या मुलींकरिता हे आसन फार उपयोगी आहे.
टीप: पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, किंवा मणक्यांचा आजार असलेल्यांनी हे आसन करू नये, अश्या लोकांनी तज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखालीच या आसनाचा सराव करावा.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏